सावंतवाडी : सावंतवाडीत मल्टिस्पेशालिटी रुग्णालय होणार म्हणून कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. मात्र मंत्री दीपक केसरकर यांच्या हेकेखोर स्वभावामुळेच मंजूर रुग्णालयाचा निधी पडून आहे. अन्यथा हे रुग्णालय झाले असते. त्यांना जनतेचे देणेघेणे नाही. स्वत:पुरते सगळे करायचे आहे, अशी खासदार विनायक राऊत यांनी केली.ते सावंतवाडीत शिवसेनेच्या माध्यमातून नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांचा सत्कार सोहळ्यात बोलत होते. यावेळी बाळा गावडे, संजय पडते, जान्हवी सावंत, शैलेश परब, चंद्रकांत कासार, मायकल डिसोजा, योगेश नाईक, आबा सावंत, रुपेश राऊळ, गुणाजी गावडे उपस्थित होते.राऊत म्हणाले, सावंतवाडीत गेली कित्येक वर्षे रुग्णव्यवस्था कोलमडली आहे. अशा दुरवस्थेमुळे सावंतवाडी तालुक्यातील रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णांचा होणारा हा त्रास कमी करण्याची जबाबदारी ही तुमच्याकडे आहे, असे मला ओटवणेचे सरपंच दाजी गावकर यांनी सांगितले आहे. मात्र, रुग्णालयाचा प्रश्न आम्ही यापूर्वीच घेतला होता. येथील केसरकर यांनी ते मंजूर करून घेतले हेसुद्धा खरे. मात्र त्यांनी ते मंजूर करून तो प्रश्न रेंगाळत ठेवला हेसुद्धा तेवढेच खरे आहे.मल्टी स्पेशालिटी मंजूर झाल्यानंतर आम्ही जागा बघत होतो. मात्र त्याच वेळी वेत्ये ग्रामपंचायतने आपली जागा सरकारला फुकट देतो असे सांगितले. महामार्गानजीक हे रुग्णालय होऊ दे असे सांगितले. त्यावेळी आम्ही ती जागा निश्चितसुद्धा केली, पण आपल्या अधिकारावर अतिक्रमण करतात अशी तक्रार केसरकर यांनी करत नेहमीप्रमाणे खोडा घातला, अन्यथा रुग्णालय तेव्हाच झाले असते.घोषणांपलीकडे काही करत नाहीतसावंतवाडी तालुक्यासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला याचा फायदा होणार होता. मात्र घोषणा करण्यापलीकडे काही करायचेच नाही, असे केसरकर यांचे झाले आहे. जिल्ह्यातील एक लाख लोकांना सेटटॉप बॉक्स देणार असे केसरकर यांनी सांगितले होते. त्या वेळी मी सांगितले की अगोदर तुमच्या मतदारसंघात ते द्या आणि नंतर जिल्ह्यात वाटप करा. मात्र, घोषणांपलीकडे आणि आश्वासनापलीकडे केसरकर यांनी काहीच केले नाही, अशीही टीका राऊत यांनी केली.सामान्य शिवसैनिक हाच कणाया वेळी शैलेश परब यांनी सामान्य शिवसैनिक हाच आपला कणा आहे. त्यामुळे सर्वानी एकसंध होऊन काम करू या असे सांगितले. सत्कार कार्यक्रमात संजय पडते, बाळा गावडे यांनीही विचार मांडले.
केसरकरांच्या हेकेखोर स्वभावामुळेच मल्टिस्पेशालिटीचा मंजूर निधी पडून, विनायक राऊतांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2023 6:58 PM