कणकवली: शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आम्ही देवगड तालुक्यात काम केले. मात्र या कामाची योग्य ती दखल घेतली गेली नाही. खरे पाहता सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेत गटतट निर्माण होण्यामागे आमदार वैभव नाईक यांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर यांनी केला आहे. कणकवली येथील शिवसेना शिंदे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयात आज, शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संदेश सावंत-पटेल, सुनील पारकर, शेखर राणे, दिलीप गावकर आदी उपस्थित होते.विलास साळसकर म्हणाले, नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर २००७ पासून देवगड तालुक्यात ५ तालुकाप्रमुख झाले. त्यातील कोण प्रामाणिक राहिले नाहीत. मी मात्र माझा व्यवसाय सोडून प्रामाणिक राहिलो. जे काही शिवसैनिक होते, त्यांना घेऊन काम केले. गेले ५ वर्ष मी नाराज होतो. पदावरुन हटवल्यानंतर आमदार वैभव नाईक यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी त्यांनी खासदार विनायक राऊत व संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्याशी बोलावे लागेल, असे सांगितले. गेले वर्षभर तक्रारी केल्या आहेत त्यांना व आम्हाला एकत्र बसवा असे सांगितले. त्या बैठका अद्याप झालेल्या नाहीत.पक्ष प्रमुखांना भेटून देखील न्याय मिळाला नाहीजी प्रतिज्ञापत्र आम्ही केली ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना या नेत्यांनी नेवून दिली. २ ऑगस्टला दुधवडकर यांची उपनेते म्हणून निवड झाली म्हणून त्यांना फोन केला. त्यावेळी त्यांनी दुसऱ्या दिवशी भेटायला या असे सांगितले. अरुण दुधवडकर यांच्यासोबत तीन तास मी मातोश्रीवर होतो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आम्ही भेटलो. मात्र, पक्ष प्रमुखांना भेटून देखील मला न्याय मिळाला नाही. म्हणून मी नाराजीने शिंदे गटात सहभागी झालो...त्यामुळे खासदार विनायक राऊत दोन वेळा विजयी झालेमी सातत्याने खासदार विनायक राऊत यांना भेटत होतो. मात्र, दोन दोन वेळा भेटून सुद्धा निर्णय होत नसेल तर काय उपयोग ? माझ्याप्रमाणेच जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये आमदार नाईकांविरोधात नाराजी आहे राणेंविरोधात लढताना आम्ही होतो. ते सर्व आता आम्ही चौथ्या, पाचव्या फळीत गेलो. आम्ही ओवाळून टाकलेले कार्यकर्तेच होतो, त्यामुळे खासदार विनायक राऊत दोन वेळा विजय झाले. त्यावेळी गोरीशंकर खोत कुठे होते? याचे उत्तर त्यांनी द्यावे.संदेश पारकरांवर आरोपदेवगड नगरंचायतीच्या सत्ताधारी लोकांनी विश्वास गमवला आहे. आम्ही काम केले त्यामुळेच विजय झाला. श्रेय मात्र दुसऱ्याने घेतले. कणकवलीत चमकेश गिरी करणारे नेते देवगडात येत असतात. तर संदेश पारकर यांनी राज्यात सर्वत्र देवगड नगरपंचायत जिंकली म्हणून स्वतः श्रेय घेतल्याचा आरोप विलास साळसकर यांनी यावेळी केला.
सिंधुदुर्ग: आमदार वैभव नाईकांमुळेच शिवसेनेत गटतट!, शिंदे गटात सामील झालेल्या विलास साळसकरांचा आरोप
By सुधीर राणे | Published: September 17, 2022 4:06 PM