शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

रेल्वे फाटक बंद पडल्याने वाहतूक ठप्प, कणकवलीतील साकेडी येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2022 1:50 PM

कोकण रेल्वे मार्गावर असलेल्या रेल्वे फटकांची नियमित डागडुजी केली जाते. मात्र संबधित फाटकाचा वायर रोप तुटेपर्यंत त्याकडे दुर्लक्ष कसा झाला? असा देखील प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.

कणकवली: कणकवली तालुक्यातील साकेडी येथील रेल्वे फाटक बंद पडल्याने काल, शुक्रवारी सायंकाळी सव्वा पाच वाजल्यापासून जवळपास दोन तासाहून अधिक काळ रेल्वे फाटक बंद राहिल्याने त्या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. महामार्गावरून साकेडी मार्गे नागवे, करंजे, हरकूळ आदी भागांमध्ये जाणारी वाहने या रेल्वे फाटकात दोन तासाहून अधिक काळ अडकून पडली होती.काल, शुक्रवारी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास त्या रेल्वे फाटकाचा वायर रोप तुटल्याने ते फाटक बंद झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर याबाबत रेल्वे तांत्रिक विभागाला गेटमन यांच्याकडून माहिती देण्यात आली. त्यानंतर नांदगाव येथून तांत्रिक कर्मचारी दाखल झाल्यानंतर तो वायर रोप पुन्हा जोडून रेल्वे फाटक पूर्ववत करण्यात आले. मात्र, या कालावधीत अनेक वाहने रेल्वे फाटकातच अडकून पडल्याने सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागला.कोकण रेल्वे मार्गावर असलेल्या रेल्वे फटकांची नियमित डागडुजी केली जाते. मात्र संबधित फाटकाचा वायर रोप तुटेपर्यंत त्याकडे दुर्लक्ष कसा झाला? असा देखील प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे. हा वायर रोप तुटण्यापूर्वीच जर बदलला गेला असता तर जनतेला त्रास झाला नसता. दरम्यान, दोन तासानंतर त्या मार्गावरून थांबलेली वाहतूक पूर्ववत झाली. मात्र, तोपर्यंत कणकवलीहुन कामधंद्यावरून घरी परतणाऱ्या नागरिकांना मात्र रेल्वे फटकातच वाहने ठेवून ताटकळत राहावे लागले होते. तर काहींना हुंबरट मार्गे असलेल्या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला होता.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गrailwayरेल्वेTrafficवाहतूक कोंडी