शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
3
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
4
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
5
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
6
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
7
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
8
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
9
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
11
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
12
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
13
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
15
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
16
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
17
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
18
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
19
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
20
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड

डंपरची धडक ; एक ठार

By admin | Published: April 03, 2016 11:12 PM

महामार्गावर ओसरगाव येथील अपघात : एक गंभीर जखमी

कणकवली : महामार्गावर ओसरगांव बोर्डवे फाट्यानजीक डंपरच्या धडकेत बळीराम चव्हाण (वय ३६, रा. ओसरगांव, सडा) हा दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर एक गंभीर जखमी झाला. डंपरचालकाने ठोकर दिल्यानंतर पळ काढला. गंभीर जखमीला ओरोस येथे जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत वृत्त असे की, चिरेखाणीवर काम करणारा बळीराम चव्हाण हा कुमार गणू चव्हाण (वय २२, रा. ओसरगांव, सडा) याच्यासोबत दुचाकीवरून कणकवलीहून घराकडे जात होता. बोर्डवे फाट्यानजीक समोरून येणाऱ्या डंपरची दुचाकीला धडक बसली. या धडकेने दुचाकी रस्त्याच्या कडेला उडाली. तर बळीराम चव्हाण हा जागीच ठार झाला. कुमार चव्हाण हा गंभीर जखमी झाला. डंपरच्या धडकेने दुचाकीचा चेंदामेंदा झाला होता. काही वेळाने घटनास्थळी दाखल झालेल्या ‘१०८’ रूग्णवाहिकेने जखमी कुमार चव्हाण याला ओरोस येथे जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात घडल्यानंतर पोलीस तासाभरानंतर घटनास्थळावर दाखल झाले. तोपर्यंत मृतदेह घटनास्थळी पडून होता. अपघातातील मृत आणि जखमी दोघेही मूळ कर्नाटकमधील आहेत. ओसरगांव येथील चिरेखाणीवर कामावर होते. (प्रतिनिधी) दुचाकीचा चेंदामेंदा ४महामार्गावर ओसरगाव येथे झालेल्या अपघातात डंपरची जोरदार धडक बसल्याने दुचाकीचा चेंदामेंदा झाला होता. या अपघातातील गंभीर जखमीला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.