शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

मठ-सतये गाव इको-सेन्सिटीव्ह घोषीत करावा

By admin | Published: August 16, 2015 11:47 PM

एकमताने ठराव : १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत घेतला निर्णय

वेंगुर्ले : मठ-सतये गावावर लादलेल्या सिलिका मायनिंग प्रकल्पाला असलेला ग्रामस्थांचा विरोध ग्रामसभांमधील ठराव, जनसुनावणीच्यावेळी व्यक्त झाला आहे. या पाश्र्वभूमीवर १५ आॅगस्ट रोजी झालेल्या मठ गावच्या ग्रामसभेत मठ-सतये गाव इको-सेन्सिटीव्ह (पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात यावे असा महत्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. या ग्रामसभेला दीडशे पेक्षा जास्त ग्रामस्थ उपस्थित होते.मठ-सतये गाव हे पश्चिम घाटाच्या पायथ्याजवळील डोंगरांच्या कुशीत वसलेले आहे. साधारणपणे ३000 मि. मी. पर्जन्यवृष्टी होणाऱ्या या गावात १५00 पेक्षा जास्त वनस्पतींच्या जाती आढळतात. यापैकी १00 पेक्षा जास्त दुर्मिळ औषधी वनस्पती आहेत. ११ वनस्पतींच्या प्रजातींना लुप्त होण्याचा धोका आहे. मठ ग्रामपंचायत परिसरात गवा, बिबटे, खवले मांजर, लांडगा आणि जैव विविधता साखळीतील अत्यंत महत्वपूर्ण असलेला पट्टेरी वाघ आढळल्याच्या नोंदी वनविभागाकडे आहेत. याव्यतिरिक्त सरपटणा-या प्राण्यांमध्ये घोरपड, अजगर पक्ष्यांमध्ये हॉर्नबिल, गिधाडे, फुलपाखरांच्या दुर्मिळ प्रजाती आढळतात.मठ गावातील झरे, नाले यांचे पाणी १0 किलोमीटरच्या आत असलेल्या अरबी समुद्रात वेंगुर्ला येथे मिळते. या भागात लहान झरे मुबलक प्रमाणात आहेत. पाण्याच्या उपलब्धतेमुळेच आंबा, काजू, नारळ, पोफळींच्या बागायतीवर शाश्वत जीवनपद्धती अस्तित्वात आहे. या भागात सरकारी राखीव जंगले असून, आम्हाला कोणताही प्रदुषणकारी प्रकल्प नको आहे, यासाठी मठ-सतये गाव इको-सेन्सिटीव्ह क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात यावा असा ठराव ग्रामस्थांनी पारीत केला आहे.हा ठराव शासनाने मान्य केल्यास मठ गावात कोणताही प्रदुषणकारी प्रकल्प उभा राहू शकणार नाही. इको-सेन्सिटीव्हमुळे दैनंदिन जीवनातील व्यवहारांना कोणतीही बाधा येत नसून अशा भागात फळप्रक्रिया, पर्यटन सारखे हरीत उद्योग सुरु करता येतात, ज्यातून शाश्वत रोजगार निर्मिती होण्याची शक्यता असते. स्वयंस्फूतीर्ने इको-सेन्सिटीव्हचा ठराव घेणारी मठ ग्रामपंचायत ही वेंगुर्ले तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.या महत्वपूर्ण ठरावाबरोबरच मठ गावात पट्टेरी वाघाचे अस्तित्व असल्याची नोंद जैवविविधता कायद्या अंतर्गत स्थापन झालेल्या जैवविविधता समितीच्या नोंदवहीमध्ये करण्यात यावी असाही महत्वाचा ठराव घेण्यात आला. पट्टेरी वाघाचे अस्तित्व मठ गावापुरते मयार्दीत नसून, लगतच्या तुळस, होडावडे, आडेली, वजराट या गावांच्यालगत असलेल्या डोंगरामध्येही असल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)