शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
4
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
5
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
6
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
8
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
9
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
10
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
11
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
12
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
13
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
14
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
15
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
16
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
17
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
18
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
19
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
20
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न

सिंंधुदुर्ग :शिक्षणात तडजोड चालणार नाही : नीतेश राणे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 1:17 PM

अध्यापन करणाऱ्या शिक्षकांच्या मागे खंबीरपणे उभे राहून लोकप्रतिनिधींनी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मत आमदार नीतेश राणे यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देशिक्षणात तडजोड चालणार नाही : नीतेश राणे  कणकवली तालुका परीक्षा समितीतर्फे गुणगौरव सोहळा

कणकवली : शिक्षणात तडजोड करणे म्हणजे भवितव्याशी खेळण्याचा प्रकार आहे. राज्याचा तसेच देशाचा विकास करायचा असेल तर शिक्षणात तडजोड करून चालणार नाही. शिक्षणाला पर्याय नाही. विद्यार्थ्याने चांगले शिक्षण घेऊन जिल्हा विकासाला हातभार लावावा. अध्यापन करणाऱ्या शिक्षकांच्या मागे खंबीरपणे उभे राहून लोकप्रतिनिधींनी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मत आमदार नीतेश राणे यांनी येथे व्यक्त केले.कणकवली पंचायत समिती अंतर्गत कणकवली तालुका परीक्षा समिती आयोजित येथील मातोश्री मंगल कार्यालयात मंगळवारी आयोजित गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी पंचायत समिती सभापती तथा तालुका परीक्षा समिती अध्यक्षा भाग्यलक्ष्मी साटम, उपसभापती दिलीप तळेकर, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती सायली सावंत, जिल्हा परिषद सदस्या संजना सावंत, स्वरूपा विखाळे, गटविकास अधिकारी मनोज भोसले, जिल्हा परिषद सदस्य बाळा जठार, पंचायत समिती सदस्य गणेश तांबे, मनोज रावराणे, प्रकाश पारकर, मिलिंद मेस्त्री, स्मिता मालडीकर, हर्षदा वाळके, सुजाता हळदिवे, तृप्ती माळवदे, सुचिता दळवी, दिव्या पेडणेकर, स्वाती राणे, मनिष दळवी, सहाय्यक गटविकास अधिकारी अरूण चव्हाण, गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.नीतेश राणे म्हणाले, लंडनच्या अभ्यास दौºयावरून आल्या आल्या या कार्यक्रमास उपस्थित राहिलो. अशा शैक्षणिक गुणगौरव कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी हितगुज करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारल्याने समाधान मिळते.शिक्षकांनी मार्गदर्शन करायचे. लोकप्रतिनिधींनी त्याच्या पाठीशी उभे राहून त्यांना ताकद दिली पाहिजे असे आपले मत आहे. या गुणगौरव कार्यक्रमाचा भविष्यात फायदा होणार आहे, असे ते म्हणाले. शिक्षण खात्यात चाललेल्या कारभाराबाबत त्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली. तसेच दूरसंचारच्या ह्यई-लर्निंगह्णच्या घोषणेची नीतेश राणे यांनी खिल्ली उडविली.पाटी पुस्तकांपुरते शिक्षण मर्यादित न ठेवता भविष्यात आपला विद्यार्थी स्पर्धेच्या युगात टिकून राहिला पाहिजे, म्हणून आपण १२५ शाळा डिजिटल करण्याचा उपक्रम राबविला. प्रत्येक लोकप्रतिनिधीने अशा उपक्रमास हातभार लावण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे आमदार राणे यांनी यावेळी सांगितले.यावेळी भाग्यलक्ष्मी साटम म्हणाल्या, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे तसेच आमदार नीतेश राणे यांचे सातत्याने प्रयत्न असतात. आमदार राणे यांनी शाळा डिजिटल करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला.

 क्रिकेट अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून त्यांनी युवा खेळाडूंना चांगले व्यासपीठ मिळवून दिल्याचे सांगून नारायण राणे यांचे विकासाचे, शैक्षणिक प्रगतीचे स्वप्न साकार व्हावे यासाठी पंचायत समिती राबवित असलेल्या उपक्रमांचा त्यांनी आढावा घेतला.यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत, टॅलेंट सर्च परीक्षेत, ज्ञानी मी होणारमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नीतेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. राज्यस्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शामसुंदर सावंत यांचा सपत्नीक तसेच जिल्हा पुरस्कारप्राप्त श्वेता सुहास मेस्त्री यांचा परीक्षा समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर यांनी केले. सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले तर परीक्षा समितीचे सचिव सुहास पाताडे यांनी आभार मानले.|पंचायत समितीचा पहिला नंबरमहाराष्ट्रातील सर्व पंचायत समितींचा एकत्रित गुणगौरवाचा कार्यक्रम आयोजित केला तर त्यामध्ये प्रगतशील कामगिरीत कणकवली पंचायत समितीचा पहिला नंबर लागेल, अशा शब्दात गौरवोद्गार काढून आमदार नीतेश राणे म्हणाले, कणकवली पंचायत समिती विविध लोकोपयोगी काम करीत असल्याचे पाहून समाधान वाटते.

 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग