कणकवली : कोरोना संसर्गाच्या काळात योग्य नियोजन करून कणकवली पंचायत समितीचा शिक्षण आपल्या दारी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सभापती दिलीप तळेकर आणि त्यांच्या सहकारी सदस्यांनी शिक्षण विभागाच्या माध्यमातून घेतलेला आहे. हे काम निश्चितच कौतुकास्पद आहे. राज्यातील हा पहिला उपक्रम असून त्याचे अनुकरण राज्यभरात शाळांमध्ये होईल, असा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी व्यक्त केला.कणकवली पंचायत समितीच्या सभागृहात शिक्षण आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद शिक्षण समिती सभापती सावी लोके, पंचायत समिती उपसभापती दिव्या पेडणेकर, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, राजन चिके, मिलिंद मेस्त्री, सुचिता दळवी, प्रकाश पारकर, मनोज रावराणे, गटविकास अधिकारी मनोज भोसले, गटशिक्षणाधिकारी किंजवडेकर यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित होते. शिक्षण समिती सभापती सावी लोके यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक दत्ता सावंत यांनी केले.सर्व प्राथमिक शिक्षकांची मेहनत : दिलीप तळेकरतालुक्यात विशेष उपक्रम घेण्याचा संकल्प केला. माझ्या सहकारी सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आर्थिक सहभागही घेतला. तालुक्यातील ६ हजार विद्यार्थ्यांना दर आठवड्याला प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहेत. या प्रश्नपत्रिकादुसऱ्या आठवड्यात त्या जमा केल्या जाणार. यासाठी तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षक मेहनत घेत आहेत. त्यांच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम यशस्वी होणार असल्याची भावना सभापती दिलीप तळेकर यांनी व्यक्त केली.
शिक्षण आपल्या दारी प्रभावी ठरेल : राजन तेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 5:08 PM
कोरोना संसर्गाच्या काळात योग्य नियोजन करून कणकवली पंचायत समितीचा शिक्षण आपल्या दारी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सभापती दिलीप तळेकर आणि त्यांच्या सहकारी सदस्यांनी शिक्षण विभागाच्या माध्यमातून घेतलेला आहे. हे काम निश्चितच कौतुकास्पद आहे. राज्यातील हा पहिला उपक्रम असून त्याचे अनुकरण राज्यभरात शाळांमध्ये होईल, असा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी व्यक्त केला.
ठळक मुद्देशिक्षण आपल्या दारी प्रभावी ठरेल : राजन तेली कणकवली पंचायत समितीच्या उपक्रमाचा शुभारंभ