बांदा : मला मिळालेले मंत्रीपद हे येथील जनतेचे आहे. तळागाळातील जनतेच्या विकासासाठी या मंत्रिपदाच्या माध्यमातून निश्चितच प्रयत्न करणार, असे प्रतिपादन वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी डेगवे येथे केले.राज्यमंत्री दीपक केसरकर यांचे डेगवे व बांदा येथे युतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह जनतेने जल्लोषी स्वागत केले. त्यावेळी डेगवे येथील स्थापेश्वर मंदिरात आयोजित सत्कार सोहळ्यात राज्यमंत्री केसरकर बोलत होते.यावेळी डेगवेचे माजी सरपंच विवेकानंद केसरकर, देवस्थान समितीचे बाबा देसाई, डेगवे सरपंच स्वप्नाली आंबेरकर, पडवे माजगाव उपसरपंच विठ्ठल देसाई, बाबाजी देसाई, मधुकर देसाई, दत्तप्रसाद स्वार आदींसह ग्रामस्थांनी केसरकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी खासदार विनायक राऊत, कुडाळचे आमदार वैभव नाईक, अरुण दुधवडकर, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, राजू नाईक, गणेशप्रसाद गवस आदी उपस्थित होते.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, तालुकाध्यक्ष मंदार कल्याणकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख भैय्या गोवेकर, माजी सरपंच शितल राऊळ, श्रीकृष्ण काणेकर, अशोक दळवी, प्रशांत पांगम, संदेश पावसकर, व्यापारी संघ अध्यक्ष दत्तप्रसाद पावसकर, सचिव सचिन नाटेकर, भाऊ वाळके, पिंट्या गायतोंडे, पांडुरंग नाटेकर, राजेश विर्नोडकर, हनुमंत सावंत, संजय आईर, गिरिश नाटेकर यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)बांद्यात स्वागतबांदा कट्टा कॉर्नर चौकात ग्रामविकासमंत्री दीपक केसरकर यांचे ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषी स्वागत करण्यात आले.
जनतेच्या विकासासाठी प्रयत्न
By admin | Published: December 14, 2014 10:19 PM