शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
2
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
3
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
4
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
5
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
6
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
7
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
8
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
9
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
10
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
11
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
12
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
13
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
14
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
15
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
16
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
17
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
18
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
19
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
20
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...

मोदी सरकारची आठ वर्षे सुशासन, गरीब कल्याणाची!, काँग्रेसच्या काळात देशाची बदनामी-नितेश राणे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2022 12:28 PM

कोरोनानंतर देश स्थिरावतो आहे सावरतो आहे त्यामुळे जनतेने संयम पाळावा. अमेरिका, चीनला मागे टाकून भारत देश मोदींच्या नेतृत्वाखाली महासत्ता बनेल.

कणकवली : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अकरा कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना १८२ लाख कोटी रुपयाचे वाटप मोदी सरकारने केले आहे.कोरोना काळात ८० कोटी जनतेला मोफत अन्नधान्य,स्वतःच्या कोरोना लस निर्माण केल्या,९ कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन, ३ कोटीहून अधिक लोकांना मालकीचे घर देणे , सुमारे तीस लाख फेरीवाल्यांना कर्जपुरवठा करून पुन्हा व्यवसाय उभारण्यात आल्या आहेत. ४१ कोटींहून अधिक जनधन खाती या सारख्या शेकडो योजनांतून मोदी सरकारने गरीब कल्याण कार्यक्रम प्रभावीपणे अमलात आणल्याने शोषित, वंचित वर्गाला संरक्षण मिळाले आहे असे प्रतिपादन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या आठव्या वर्षपूर्ती निमित्त भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची ८ वर्षे या अभियानाचे औचित्य साधत कणकवली येथील पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे बोलत होते . ते म्हणाले , 'सब का साथ, सब का विकास', 'सब का विश्वास आणि सब का प्रयास 'हा मंत्र घेऊन मोदी सरकारने गेल्या आठ वर्षात अंत्योदय आणि एकात्म मानववादाला केंद्रस्थानी ठेवत गोरगरिबांच्या कल्याणाच्या अनेक योजना प्रत्यक्षात आणल्या . त्याचबरोबर देशांतर्गत सुरक्षा मजबूत करणे , दहशतवादी शक्तींना त्याच भाषेत उत्तर देण्याचे कणखर धोरण यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताची प्रतिमा बलशाली राष्ट्र अशी तयार झाली आहे. वैश्विक पातळीवर भारताकडे आदराने पाहिले जात आहे .भारतीय अर्थव्यवस्था जगातील वेगाने वाढणारी

भारतासारख्या खंडप्राय देशात लसीकरणाचे आव्हान यशस्वीपणे पेलत मोदी सरकारने प्रगत देशांनाही मागे टाकले . कोरोना काळातच पंतप्रधान गरीब कल्याण योजना राबवत गोरगरीब उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली. या योजनेची जागतिक बँकेनेही प्रशंसा केली आहे. आत्मनिर्भर भारतासारखी संकल्पना प्रत्यक्षात आणल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अशी ओळख झाली आहे.

देश मोदींच्या नेतृत्वात महासत्ता बनेलआजची जगातील महागाई पाहता श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळ असे देश फारच अडचणीत आले आहेत.त्या मानाने भरतात महागाई खूपच आटोक्यात आहे. कोरोनानंतर देश स्थिरावतो आहे सावरतो आहे त्यामुळे जनतेने संयम पाळावा अमेरिका, चीनला  मागे टाकून भारत देश मोदींच्या नेतृत्वाखाली महासत्ता बनेल. असा विश्वास आमदार राणे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस