- अनंत जाधवसावंतवाडी - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी 2014 साली सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काँग्रेसकडे आघाडीचा प्रस्ताव घेऊन आले होते अशी केलेली टीका चुकीची आहे. त्याकाळात शिंदे हे निर्णय प्रक्रियेतच नव्हते.त्यांना कदाचित शिवसेना पक्षप्रमुखाचा आदेश असेल त्यामुळेच ते तिथे गेले असावेत असा अंदाज राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
ते सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते.यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे उपस्थित होते. मंत्री केसरकर म्हणाले,कोल्हापूर सारख्या एका शाहूनगरी चा मला पालकमंत्री करण्यात आला हे मी माझे भाग्य समजतो कोल्हापूर चा पर्यटन दृष्ट्या विकास करणारच पण उद्योग व्यवसायातही कोल्हापूर अग्रेसर राहिल यांची काळजी घेतली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शिंदे गटाचा दसरा मेळावा हा न भुतो ना भविष्याती असाच होणार आहे. शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जात आहेत त्यामुळेच मोठ्याप्रमाणात शिवसैनिक दसरा मेळाव्यात सहभागी होतील तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही हजारो शिवसैनिक मुंबई ला येणार असून त्याचे नियोजन ही योग्य प्रकारे सुरू आहे असेही मंत्री केसरकर यांनी यावेळी सांगितले.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या टिकेला ही मंत्री केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले 2014 साली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेत निर्णय प्रकियेत नव्हते मग ते प्रस्ताव कसा काय घेऊन येतील आणि कामानिमित्त कोण ही कोणाला भेटू शकत नाही का असा सवाल करत प्रस्ताव देण्याचे काम शिंदे यांनी केले तर तो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश असेल आणि नंतर त्यांनीच काॅग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती केली हे ही सर्वानी पाहिली असे मंत्री केसरकर यावेळी म्हणाले.