कणकवली : हरकुळ बुद्रुक ग्रामपंचायतीकडे नळ पाण्याची जोडणी मिळावी यासाठी आम्ही वारंवार मागणी करीत आहोत. मात्र, ती न दिल्याने १७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून ग्रामपंचायतीसमोर पत्नीसह उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती चंद्रकांत शिवराम घाडीगांवकर यांनी दिली.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, हरकुळ बुद्रुक येथे आपले झोपडीवजा घर आहे. घराच्या कुंपणाबाहेरून दहा फुटावरून पुढच्या घराला नळ जोडणी दिलेली आहे. दहा वर्षांपूर्वी नळ योजनेचे ७०० रुपये भरून घेतलेले आहेत. दरम्यान, या उपोषणाबाबतचे पत्र सरपंच व ग्रामसेवक यांना देण्यात आले असून त्याची प्रत प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींना पाठविण्यात आली आहे.मुदत संपली तरी कार्यवाही नाहीपत्नी तसेच मी वयोवृद्ध झाल्याने दूरवरून पाणी आणणे कठीण होत आहे. याबाबत सविस्तर माहितीचा अर्ज २५ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायतीला दिलेला आहे. त्यावेळी १५ दिवसांची मुदत दिली होती. ती ९ डिसेंबर रोजी संपली आहे. तरीसुद्धा कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आम्ही उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे, असेही या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
नळ जोडणीसाठी वृद्ध दांपत्य उपोषण करणार,हरकुळ बुद्रुक ग्रामपंचायतीला इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 11:19 AM
हरकुळ बुद्रुक ग्रामपंचायतीकडे नळ पाण्याची जोडणी मिळावी यासाठी आम्ही वारंवार मागणी करीत आहोत. मात्र, ती न दिल्याने १७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून ग्रामपंचायतीसमोर पत्नीसह उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती चंद्रकांत शिवराम घाडीगांवकर यांनी दिली.
ठळक मुद्देवृद्ध दांपत्य उपोषण करणार,हरकुळ बुद्रुक ग्रामपंचायतीला इशारा नळ जोडणीची केली मागणी