रत्नागिरी : जिल्ह्यातील ४६१ ग्रामपंचायतींपैकी आता ३३१ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. खेडमध्ये केवळ एकाच ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूक होणार आहे.जिल्ह्यातील ४६१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आणि ९० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यासाठी येत्या २२ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मात्र, आता नऊही तालुक्यांमध्ये काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. जिल्ह्यातील एकूण १३० ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आता ३३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी २२ रोजी मतदान होणार आहे. यंदा बिनविरोध निवडणुकीकडे स्थानिक ग्रामस्थांचा कल असल्याचे दिसून येते.अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर उमेदवारांची यादी निश्चित करून त्यांना चिन्ह वाटप करण्यात आले आहे. आता सर्व तालुक्यांना मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक असणारे साहित्य तसेच मागणीनुसार इलेक्ट्रॉनिक्स मशीन पाठविण्याची लगबग आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीत सुरू होती. (प्रतिनिधी)‘बिनविरोध’कडे कलयंदा ग्रामपंचायत बिनविरोध होण्याकडे स्थानिक ग्रामस्थांचा कल जास्त होता. त्यामुळे निवडणूकदरम्यान होणारे तंटे कमी झाले आहेतच, शिवाय त्याठिकाणी निवडणूक यंत्रणेवर होणारा खर्चही वाचला असल्याचे दिसून येते.नऊ तालुक्यातील ग्रामपंचायती, प्रभाग, मतदान केंद्र (तालुकानिहाय)तालुकाग्रामपंचायतप्रभागमतदानसंख्या संख्याकेंद्रमंडणगड९२०२०दापोली३२७८७९खेड६२१५३१५४चिपळूण५५१४३१४४गुहागर२१ संगमेश्वर५०१३३१३३रत्नागिरी४२१३४१३५लांजा१६४०४०राजापूर४४११२११२एकूण३३१८१३८१७
३३१ ग्रामपंचायतीत होणार निवडणुका
By admin | Published: April 16, 2015 11:33 PM