शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

मोर्ले येथे पुन्हा हत्तींची दहशत; वस्तीजवळ वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 1:21 AM

मात्र हत्ती आणखी आक्रमक झाले व ग्रामस्थांच्या दिशेने चाल करून आले.

सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुक्यातील तिलारी परिसरात हत्तींनी पुन्हा उपद्रव सुरू केला असून मोर्ले येथे शुक्रवारी मध्यरात्री तीन हत्तींच्या कळपाने ग्रामस्थांची झोप उडवली.  सरपंच महादेव गवस यांनी 'लोकमत'ला दिलेल्या माहितीनुसार, हत्तींनी बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. मोर्ले येथे एका वृद्धेचे शुक्रवारी रात्री निधन झाले. तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ग्रामस्थ रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास गावालगतच्या स्मशानभूमीत गेले. तेथे नजीकच्या एका बागायतीत तीन हत्ती असल्याचा सुगावा लागला. ग्रामस्थांनी त्यांना हाकलून लावण्याचे प्रयत्न केले. मात्र हत्ती आक्रमक झाले व बागयतीची नासधूस करू लागले. अखेरीस काही युवकांनी गावात जाऊन फटाके आणले व हत्तींच्या दिशेने फेकले. मात्र हत्ती आणखी आक्रमक झाले व ग्रामस्थांच्या दिशेने चाल करून आले. हा प्रकार रात्री साडेबारा वाजता घडला. हत्तींच्या उपद्रवामुळे त्या वृद्धेच्या अंत्यविधीसाठी चिता रचणेही अवघड बनले होते. 

रात्री उशिरापर्यंत हत्तींना हाकलून लावण्याचे प्रयत्न सुरू होते. घटनास्थळी उपसरपंच पंकज गवस, सदस्य समीर खुटवळकर, आबा चव्हाण, रमेश गवस आदी ग्रामस्थ उपस्थित होते. हत्ती वस्तीलगत येऊन ठेपल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग