लोकमत न्यूज नेटवर्कबांदा : बांदा-सटमटवाडी येथील विजय शांताराम कुडव (वय ६७) यांचे गोवा-बांबोळी येथे गुरुवारी दुपारी माकडतापाने उपचारादरम्यान निधन झाले. त्यांना माकडतापाची लागण झाल्याने त्यांच्यावर गेले सहा दिवस गोवा-बांबोळी येथे उपचार सुरू होते. सावंतवाडी तालुक्यातील माकडतापाचा हा अकरावा, तर सर्वाधिक रुग्णसंख्या सापडलेल्या सटमटवाडीतील सातवा बळी आहे. आतापर्यंत बांदा सटमटवाडी व परिसरातील २८८ जणांचे रक्ताचे नमुुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी १0६ जणांना माकडतापाची लागण झाल्याचे निदान झाले आहे.विजय कुडव हे माकडतापाचे सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या जोखीमग्रस्त सटमटवाडी भागात राहत होते. ते बांदा शहरात पायलटिंगचा व्यवसाय करत होते. त्यांना ताप येत असल्याने ४ मे रोजी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी मणिपाल येथे पाठविण्यात आले होते. त्यावेळी त्यांना माकडतापाची लागण झाल्याचे निदान झाले होते. तसेच त्यांच्या रक्तातील तेथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात गेले सहा दिवस उपचार सुरू होते. गुरुवारी दुपारी त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.स्थानिकांमध्ये घबराटीचे वातावरणअवकाळी पाऊस झाल्याने दूषित गोचिडींचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता होती. मात्र या गोचिडींचे प्रमाण अद्यापही सटमटवाडी परिसरात कमी झालेले नाही. या परिसरात माकडतापाचे रुग्ण हे नव्याने सापडत असल्याने स्थानिकांमध्ये घबराटीचे वातावरण अद्यापही आहे. सटमटवाडी परिसरात माकडांच्या मृत्यूचे प्रमाण हे कमी झाले आहे. मात्र तरीही काही ठिकाणी मृत माकडे सापडत आहेत. माकडताप साथ आटोक्यात येण्यासाठी आरोग्य यंत्रणादेखील सतर्क असून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
माकडतापाने घेतला अकरावा बळी
By admin | Published: May 11, 2017 11:17 PM