शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
2
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
3
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
4
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
5
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
6
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
7
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
8
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
9
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
10
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर
11
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
12
IND vs NZ : भारताची आपल्या घरात 'कसोटी' तरी बुमराहला का विश्रांती? BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण
13
गुरु-शुक्राचा राजयोग: ९ राशींना सुखकर, दिवाळीनंतरही लाभ; उत्पन्न वाढ, नवीन नोकरीची संधी!
14
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
15
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
16
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
17
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
18
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
19
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
20
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार

पर्ससीनविरोधात पुन्हा एल्गार

By admin | Published: March 30, 2017 11:28 PM

पारंपरिक मच्छिमार आक्रमक : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार

रत्नागिरी : पर्ससीननेटद्वारे मासेमारीला असलेली बंदी आता केवळ कागदावरच उरली आहे. मत्स्यव्यवसाय खाते व काही लोकप्रतिनिधी यांच्या वरदहस्तामुळे शेकडो पर्ससीन नौका राजरोस मासेमारी करीत आहेत. बंदी आदेशाला हरताळ फासत आहेत. त्यामुळे पारंपरिक मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली असल्याचा आक्षेप घेत या मच्छिमारांनी पर्ससीनविरोधात एल्गार पुकारला आहे.शासनाच्या आदेशाप्रमाणे पर्ससीन मासेमारी १ जानेवारीपासून सात महिने पूर्णत: बंद व्हावी, या मागणीचे निवेदन अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या नेतृत्वाखाली येत्या सोमवारी (दि. ३ एप्रिल) जिल्हाधिकाऱ्यांना दिले जाणार आहे. तरीही कारवाई न झाल्यास त्यानंतर पंधरा दिवसांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पारंपरिक मच्छिमार शेकडोंच्या संख्येने उपोषणाला बसतील, मोर्चा काढतील, असा इशारा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष खलील वस्ता यांनी गुरुवारी दिला.बंदी मोडणाऱ्या पर्ससीन मासेमारीबाबत चर्चेसाठी गुरुवारी राजिवडा-रत्नागिरी येथे पारंपरिक मच्छिमारांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. यानंतर बोलताना वस्ता म्हणाले की, बंदी आदेश मोडून मासेमारी करणाऱ्या अनेक पर्ससीन नौका पारंपरिक मच्छिमारांनी पकडून दिल्या, परंतु या नौकांवर कारवाईला मत्स्यव्यवसाय खात्याकडून तीन ते चार तास विलंब लावला जातो, हा नेहमीचा अनुभव आहे. कारवाईच्यावेळी मोठ्या प्रमाणात मासे नौकांमध्ये असूनही कागदावर मात्र किरकोळ मासे दाखवून दंड कमी केला जातो. गेल्या अनेक दिवसांपासून मत्स्यव्यवसाय खात्याकडून थातूर-मातूर कारवाई केली जात आहे. तहसीलदारांकडून या नौकांना किती दंड झाला याबाबत कोणतीही माहिती दिली जात नाही. माहितीच्या अधिकारात पाच वर्षांतील कारवाई व दंडाची माहिती मागूनही देण्यात आली नाही, असा आरोप वस्ता यांनी केला. जिल्ह्यात एकूण साडेतीन हजार मच्छिमारी नौका असून, त्यामध्ये २७८ पर्ससीन नौका आहेत. मिनी पर्ससीन ४ ते ५ असून, पर्ससीन व मिनी पर्ससीन मिळून ४०० पेक्षा अधिक नौका विनापरवाना आहेत. राज्य शासनाने पारंपरिक मच्छिमारीच्या भल्यासाठीच पर्ससीन मासेमारीवर ठरावीक काळासाठी बंदी आदेश लागू केला आहे. मात्र, मत्स्यव्यवसाय खाते व संबंधित कार्यालयांकडून या कायद्याची अंमलबजावणीच होत नाही. बंदीची अंमलबजावणी व्हावी, यासाठीच पारंपरिक मच्छिमारांचा हा लढा आता अधिक व्यापक केला जाणार असल्याचे वस्ता म्हणाले. (प्रतिनिधी)पारंपरिक मच्छिमारांची भूमिका...- २०१६ मध्ये पर्ससीन बंदी काळात ९९ टक्के पर्ससीन मासेमारी बंद होती. त्यामुुळे पारंपरिक मच्छिमारांना कधी नव्हे इतक्या प्रमाणात मासे मिळाले होते.- २०१७ मध्ये पर्ससीन मासेमारी नौकांकडून बंदी आदेशाचे उल्लंघन सुरूच आहे.- माशांचा प्रजनन काळ पावसाळ्यातच असतो असे नसून, त्या पुढील महिन्यांमध्येही माशांच्या प्रकारानुसार प्रजननकाळ असतो. त्यानुसारच सोमवंशी समितीने बंदीची शिफारस केली होती. - मत्स्यव्यवसाय खात्याचे अधिकारीही बंदी मोडणाऱ्या पर्ससीन नौकावाल्यांना वाचवत असून, हे प्रकार तत्काळ थांबवावेत. - १२ नॉटीकलबाहेरील सागरी क्षेत्रात पर्ससीन मासेमारी सुरू असून ती हद्द केंद्र सरकारची आहे, असे मत्स्यव्यवसाय खात्याने सांगितल्यानेच जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे दाद मागणार आहोत. - सागरात पर्ससीन नौका पकडण्यासाठी यंत्रणा नाही तर बंदरात या नौकांवर कारवाई का होत नाही, हा खरा सवाल आहे. - पर्ससीन जाळ्यांच्या आसाबाबतच्या नियमांचेही उल्लंघन होत असून, मत्स्यबीजच नष्ट केले जात आहे.