शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
3
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
4
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
5
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
6
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
7
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
8
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
9
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
10
IND vs SA: फ्लॉप शोचा सिलसिला संपला! Abhishek Sharma नं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
11
BJP च्या विजयासाठी RSS ने आखली योजना; प्रत्येक मतदारसंघासाठी बनवला 1-2-3 चा फॉर्म्युला
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

कोरोना रिकव्हरी रेट वाढविण्यावर भर द्या : के. मंजुलक्ष्मी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 2:24 PM

Collcatror Kankavli Sinhudurg- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, तसेच रिकव्हरी रेट वाढविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी गुरुवारी येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जिल्ह्यातील कोविड परिस्थितीबाबत आढावा बैठक घेतली.त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या.

ठळक मुद्दे कोरोना रिकव्हरी रेट वाढविण्यावर भर द्या : के. मंजुलक्ष्मी पोस्ट कोविड ओपीडी सुरू करावी

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, तसेच रिकव्हरी रेट वाढविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी गुरुवारी येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जिल्ह्यातील कोविड परिस्थितीबाबत आढावा बैठक घेतली.त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या.या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, वंदना खरमाळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यातील मृत्यूदर हा राज्यातील मृत्यूदरापेक्षा जास्त असल्याचे सांगून जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या की, सावंतवाडी तालुक्यात मृत्यूदर जास्त आहे. त्याची कारणे शोधून त्याचा अभ्यास करावा, सावंतवाडीतील मृत्यूदर कमी करण्यासाठी तालुका स्तरावरील अधिकारी व यंत्रणांनी नियोजन करून काम करावे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेटही वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणांनी काम करावे तसेच ज्या रुग्णांना घरी सोडले जात आहे, त्यांचा डाटा दररोज अपडेट करावा.परदेशातून येणाऱ्यांची माहिती गोळा करावीकोविड केअर सेंटर येथे किमान कर्मचारी उपलब्ध करून द्यावे. नव्या कोरोना स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर सर्वच यंत्रणांनी सतर्क रहावे. जिल्ह्यात परदेशातून येणाऱ्या सर्व नागरिकांची माहिती त्यामध्ये स्थानिक व पर्यटक अशा दोन्ही प्रकारच्या लोकांची माहिती संबंधित यंत्रणांनी गोळा करावी. त्यासाठी योग्य तो समन्वय ठेवावा. उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय स्तरावर पोस्ट कोविड ओपीडी सुरू करावी.

गर्दीच्या ठिकाणांवरील व्यापारी तसेच रिक्षाचालक, बसचालक, हॉटेलमधील कर्मचारी यांची कोविडची चाचणी करण्यासाठी संबंधित संघटनांशी चर्चा करून तसे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या. यावेळी लसीकरण नियोजनाचाही आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. तसेच माकड तापाचाही आढावा घेण्यात आला.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग