आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी दि. १५ : जिल्हा प्रशासन सिंधुदुर्ग, जिल्हा परिषद तसेच महाराष्ट्र सुदूर सर्वेदन उपयोजन केंद्र (एमआरएसएसी) यांच्या संयुक्त विद्यमाने अवकाशीय तंत्रज्ञानाव्दारे पंचायतीराज संस्थांचे सक्षमीकरण करण्यासाठी कार्यशाळेचे जुना डिपीडीसी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आले.या कार्यशाळेचे उदघाटन मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी केले. कार्यशाळेमध्ये सुक्ष्मनियोजन प्रक्रीयेदरम्यान जीपीएस प्रणालीव्दारे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालय, सर्व प्राथमिक शाळा, अंगणवाडी, उपकेंद्र, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक शौचालय, पाण्याची टाकी इ. सर्व जिल्हा परिषद मालकीच्या मालमत्ता यांची नोंदणी करावयाची आहे. यामध्ये जीटीएस मॅपिंग करीता सर्व तालुका निहाय शासकीय मालमत्तेची नोंद करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये एसएएमएमएस प्रणालीच्या सहाय्याने नोंदणी करण्याची पध्दती बाबत सविस्तर मार्गदर्शन खोब्रागडे यांनी केले नंतर या प्रणालीचा प्रात्याक्षिकद्वारे वापर करुन मार्गदर्शन करण्यात आले. याच पध्दतीने कार्यशाळा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून त्याप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेसाठी सर्व तालुक्यामधील गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, प्रतिनिधीक सरपंच व ग्रामसेवक तसेच सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रणदिवे यांनी या कार्यशाळेचे सूत्रसंचलन केले.
सिंधुदुर्गनगरीत अवकाशीय तंत्रज्ञानाव्दारे पंचायतीराज संस्थांचे सक्षमीकरण
By admin | Published: July 15, 2017 1:17 PM