सावंतवाडी : अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी येथे नुकताच ‘आनंद मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर यांच्या हस्ते झाले. या मेळाव्यात अनेक मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक चवदार खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थांची चव घेतली. आनंद मेळाव्याची मजा खऱ्या अर्थाने लुटली. यावेळी मिलाग्रीसचे मुख्याध्यापक फादर फेलिक्स लोबो, उपमुख्याध्यापिका मेबल कारवालो, पॅरिस प्रिस्ट फादर इलायस रॉड्रिक्स, एल. आर. गावडे, सर्व शिक्षक, पालक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. मेळावा यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. सुमारे ५००० लोकांनी या आनंद मेळाव्यास उपस्थिती दर्शविली. (प्रतिनिधी)
मिलाग्रीस हायस्कूलचा आनंद मेळावा उत्साहात
By admin | Published: December 14, 2014 8:11 PM