बांदा : भालावल गावात माकड तापाचा रुग्ण आढळून आलेला असतानाच आता तांबोळी गावात सुद्धा माकड तापाचे २ रुग्ण आढळून आल्याने बांदा पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. आज सकाळी दोन रुग्णांना प्राथमिक उपचारासाठी सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून अधिक उपचारासाठी त्यांना गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले.भालावल गावात माकड तापाने थैमान घातल्याने येथील नागरिक हैराण झाले आहेत.तर १ महिन्यापूर्वी माकड तापाने येथील एका वृद्ध महिलेचे निधन झाले होते.आता प्रथमच तांबोळी गावात माकड तापाचे रुग्ण आढळल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तांबोळी गाव हा काजू उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.त्यामुळे ऐन हंगामात माकड तापाची साथ पसरल्यामुळे येथील काजू उत्पादक शेतकरीसुद्धा चिंतेत सापडले आहेत.