पाली : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण प्रक्रियेने आता वेग घेतला आहे. मे व जून महिन्यात रत्नागिरी तालुक्यातील गावांमध्ये भूसंपादन पूर्व मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली होती. आता भूसंपादनाची प्राथमिक प्रक्रिया सुरु झाली असली तरी त्यात अनेक त्रुटी असल्याचे प्रकल्पग्रस्तांनी सांगितले. त्यामुळे ते सध्या संभ्रमावस्थेत आहेत.रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा, झरेवाडी, वेळवंड, निवळी - रावणंगवाडी, तारवेवाडी, चरवेली, नागलेवाडी, मराठेवाडी, खानू, पाली या गावांच्या भूसंपादनासाठीची प्राथमिक सूचना प्रसिद्ध झाली आहे. त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याचे दिसून येत आहे. महामार्गालगत असूनही ज्या भूखंडांचे भूसंपादन पूर्व मोजणीत सीमांकन झाले आहे. मात्र, राजपत्रामधील सूचनेमध्ये अंशत: जमीन संपादनात त्याच्या क्रमांकाची नोंद नाही. शिवाय या सूचना प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसांच्या आत हरकती नोंदवायच्या आहेत. त्यामुळे आता तीही मुदत संपत आली आहे. तांत्रिक कारणाने जर क्षेत्रांची नोंद प्रसिद्ध झाली नसेल तर संबंधितांना त्याला हरकत घेता येणार नाही. त्यामुळे आम्ही संभ्रमावस्थेत आहोत, असे महामार्ग प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती, पालीतर्फे सांगण्यात आले.पालीमधील काही जमिनी या महामार्गासाठी संपादीत होत असल्या तरी त्यांच्यासोबतच लगतच्या अन्य भूखंडधारकांनाही या सूचनेमध्ये समाविष्ट करण्यात आले असल्याने तेही गोंधळात सापडले आहेत. शिवाय यासंदर्भात संबंधित विभागाकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे हे भूखंडधारक संभ्रमावस्थेत आहेत. भू संपादनाच्या प्रक्रियेत ग्रामस्थांना अंधारात ठेवून कोणतेही काम न करण्याची मागणी संघर्ष समितीने केली आहे. (वार्ताहर)पाली येथे पर्यायी बाह्यवळण मार्गालाही तत्वत: मंजुरी मिळाली असून, काही दिवसांपूर्वी याच पर्यायी बाह्यवळण मार्गासाठीची सर्वेक्षण प्रक्रिया करण्यासाठी संबंधित विभागांना आदेश प्राप्त झाले आहेत. सध्या याच महामार्गावर चौपदरीकरण करण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया राबवली जात असल्याने ग्रामस्थ नाराज आहेत. पालीतील काही भूखंडधारकांना तर भूमी अभिलेख विभागाकडूनही भूखंडाचे कमी जास्त पत्रक करण्याच्या संदर्भातील पत्र आली आहेत. या सर्व प्रक्रियेमुळे पालीसह परिसरातील ग्रामस्थ या भूसंपादन प्रक्रियेमुळे गोंधळून गेले आहेत. त्यामुळे याबाबत योग्य ती माहिती ग्रामस्थांना देण्याची मागणी करण्यात येत आहे.प्रभाकर राऊत : बाह्यवळण मार्गालाही तत्वत: मान्यतायोग्य माहितीमुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, ही मोहीम राबविताना पाली येथील ग्रामस्थांमध्ये संभ्रमावस्था आहे. ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करणे गरजेचे असून, त्यांना योग्य माहिती देण्याची गरज आहे.
भूसंपादनाच्या प्रक्रियेत त्रुटी?
By admin | Published: November 20, 2015 10:59 PM