शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
2
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
3
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
4
परभणीत लहान मुलांच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक, वाहनांची नासधूस, शहरात तणावपूर्ण शांतता
5
बांगलादेशने तोडला इंदिरा गांधी-मुजीब उर रहमान यांच्या काळातील करार, सीमेवर केलं असं कृत्य 
6
"आता सुरूवात झालीय, येत्या काळात..."; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला इशारा
7
विद्यार्थ्यांने धागा काढला नाही, म्हणून परीक्षेला बसवले नाही; कॉलेजच्या प्राचार्य अन् कर्मचाऱ्यांवर कारवाई
8
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
9
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
10
"घटस्फोट झाला तर मी मरून जाईन", इमरान खानची Ex पत्नी डिव्होर्सवर पहिल्यांदाच बोलली
11
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
12
लग्न झालं, वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, पाहतो तर काय, आत होती नवरीची विधवा आई, तरुणाची फसवणूक 
13
आफ्रिकेतील बोत्स्वानातून आणणार आणखी ८ चित्ते; पुढील महिन्यापर्यंत ४ चित्ते दाखल होण्याची शक्यता
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
15
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
16
चोरीच्या संशयावरून नखे काढली, दिला विजेचा शॉक; छत्तीसगडमधील थरकाप उडवणारी घटना
17
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
18
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
19
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
20
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा

रानटी हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी प्राथमिक प्रतिसाद दल स्थापन करा, वनमंत्री गणेश नाईक यांचे आदेश

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 4, 2025 19:06 IST

दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांना होणारा हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी प्राथमिक प्रतिसाद दल स्थापन करावे. तसेच या हत्तींना ...

दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांना होणारा हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी प्राथमिक प्रतिसाद दल स्थापन करावे. तसेच या हत्तींना तिलारी धरणाच्या परिसरातील संरक्षित क्षेत्रात नेण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले.दोडामार्ग तालुक्यातील रानटी हत्तींच्या उपद्रवामुळे होणाऱ्या त्रासासंदर्भात उपाययोजना करण्यासंदर्भात मंत्रालयात वनमंत्री नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या विनंतीनुसार ही बैठक लावण्यात आली होती. यावेळी वनविभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमिता बिश्वास, उपसचिव विवेक होसिंग, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक बी. व्ही. रामाराव आदी यावेळी उपस्थित होते.वनमंत्री नाईक म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात रानटी हत्तींमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. या हत्तींपासून संरक्षण करण्यासाठी वनविभागाने सविस्तर आराखडा तयार करावा. या हत्तींना नैसर्गिक अधिवासात ठेवल्यास ते शेताकडे येणार नाहीत. त्यासाठी तिलारी प्रकल्पाच्या संरक्षित भागात या हत्तींना ठेवण्यासाठी त्या ठिकाणी हत्तींच्या उपजीविकेसाठी आवश्यक असलेले बांबू, केळी, फणस आदी झाडे लावण्यात यावे. तसेच हत्तींचा वावर असलेल्या परिसरात रेल्वे रुळांचे फेन्सिंग करण्यासंदर्भात नियोजन करावे. या रानटी हत्तींना रेडिओ कॉलरिंग करून त्यांच्या वावरावर लक्ष ठेवण्यात यावे. यासाठी कर्नाटक व पश्चिम बंगालच्या वनविभागातील प्रशिक्षत मनुष्यबळांचे मार्गदर्शन घ्यावे.प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशवन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानभरपाईच्या रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव पाठवावा. तसेच यामध्ये बांबू पिकाच्या समावेशाबद्दलही प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश श्री. नाईक यांनी दिले. आमदार दीपक केसरकर यांनी दोडामार्ग तालुक्यात रानटी हत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीची माहिती देऊन लवकरात लवकर मार्ग काढण्याची विनंती केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभागministerमंत्रीGanesh Naikगणेश नाईक