सिंधुदुर्ग : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त साधून शिवसेना तालुका कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांच्या अर्धपुतळ्याची स्थापना करण्यात आली. तत्पूर्वी शिवसैनिकांनी अर्धपुतळ्याची देवली चौके मार्गे मालवण अशी भव्य ढोलताशांच्या गजरात दुचाकी रॅली काढली.
बाळासाहेब ठाकरे यांच्या घोषणांनी मालवण शहरात भगवी लाट निर्माण झाली होती. आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या उपस्थित काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीत शहरात शेकडो शिवसैनिक, महिला सहभागी झाले होते.मालवण तालुका शिवसेनेच्यावतीने आणि तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या संकल्पनेतून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मालवण तालुका शाखेत प्रथमच बाळासाहेब ठाकरे यांचा अर्धपुतळा स्थापन करण्यात आला.
तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, मंदार गावडे, गणेश कुडाळकर, बाबी जोगी, महेंद्र म्हाडगूत, राजू परब, महेश शिरपुटे, किसन मांजरेकर, रवी तळाशीलकर, सेजल परब, तृप्ती मयेकर, आकांक्षा शिरपुटे, सुनीता जाधव, दीपा शिंदे, मधुरा चोपडेकर, निधी मुणगेकर, नंदू गवंडे, गौरव वेर्लेकर, आतू फर्नांडिस, चंदू खोबरेकर, यशवंत गावकर यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.देवली येथील मूर्तिकार कमलेश चव्हाण यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा अर्धपुतळा साकारला. भव्य दुचाकी रॅली आणि ढोलताशांच्या गजरात देवली, चौके मार्गे मालवण असा पुतळा जल्लोषपूर्ण वातावरणात आणण्यात आला. मालवण शहरात शिवसेना शाखा-भरड-बाजारपेठ-फोवकांडा पिंपळ ते शाखा अशी अभिवादन रॅली काढण्यात आली. त्यानंतर पुतळ्याचे तालुका कार्यलयात पूजन करून स्थापना करण्यात आली.गजर बाळासाहेबांचा विशेष संगीत भजनस्पर्धायावेळी मूर्तिकार चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना शाखा येथे बुधवारी दुपारी महिलांसाठी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तर सायंकाळी बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना देण्यासाठी ह्यगजर बाळासाहेबांचाह्ण या विशेष संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.