शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

घरपट्टी भरल्यानंतरही पालिकेने ठोकले घराला सील

By admin | Published: April 12, 2015 10:27 PM

वसुली पथकाने सील ठोकल्याने ८५ वर्षांच्या आईसह आपल्याला बेघर व्हावे लागले.

वेंगुर्ले : थकीत घरपट्टी वसुली मोहिमेत वेंगुर्ले नगरपरिषदेच्या पथकाने राबविलेल्या कारवाईत घरपट्टी भरूनही घराला सील मारण्याची व पैसे भरण्याबाबतची विनंती करूनही घरांना सील मारण्याच्या घटना ३१ मार्च रोजी घडल्या. याबाबत घरपट्टीधारकाने पैसे भरल्याचे नगरपरिषदेच्या निदर्शनास आणून देताच मारलेले सील काढण्यात आले. तर सील मारल्याने बेघरची परिस्थिती उद्भवलेल्या महिला नागरिकाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सील काढण्याची विनंती करूनही अद्यापपर्यंत सील काढलेले नाही. दरम्यान, थकीत घरपट्टी वसुलीसाठी आलेल्या नगरपरिषदेच्या पथकाने वेंगुर्ले, कॅम्प-म्हाडा वसाहतीतील एम २५ मधील अ‍ॅड. सुप्रिया देसाई यांनी फेब्रुवारी २०१५ मध्ये घरपट्टी भरू नही त्यांच्या घरास सिल केले. मात्र, घरपट्टी भरल्याचा पुरावा दाखविताच सील काढण्यात आले. तर दूरध्वनीद्वारे तीन दिवसांनी म्हणजे ३० मार्च रोजी घरपट्टी भरते, असे सांगूनही त्याकडे दुर्लक्ष केला. या वसुली पथकाने सील ठोकल्याने ८५ वर्षांच्या आईसह आपल्याला बेघर व्हावे लागले. नगरपरिषदेने केलेली कारवाई अन्यायकारक असून नगरपरिषदेला सील काढण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी वेंगुर्ले-भटवाडी येथील वनिता मांजरेकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. भटवाडी येथील घर नं. ३००, वॉर्ड नं. ३ मध्ये आपण आईसह राहत आहोत. दोन खोल्या असलेल्या मातीच्या भिंतीचे आमचे घर आहे. घरपट्टीत वाढ करताना आमचे घर मातीचे असल्याने घरपट्टी कमी करण्याची मागणी केली होती. त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. माझी आई वारंवार आजारी असल्याने तिच्या औषधपाण्यासाठी मोठा खर्च होतो. मी घटस्फोटीत असून दोन व्यक्तींचा चरितार्थ चालविण्यासाठी आपल्याकडे भक्कम असा आर्थिक स्त्रोत नाही. केवळ मोलमजुरी करून आपण आईचा सांभाळ करीत आहे. आमची ही परिस्थिती पालिका कर्मचाऱ्यांना माहिती असून आम्ही घरी नसताना घरपट्टी वसुली पथकाने थकीत घरपट्टीमुळे घरास सील ठोकले आहे. त्यामुळे आपण बेघर झालो असून सध्या घराशेजारी उघड्यावर राहत आहोत.नगरपरिषद प्रशासनास आमच्या घराचे सील काढण्याच्या सूचना देऊन न्याय द्यावा, अशी मागणी वनिता मांजरेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. (प्रतिनिधी)