सिंधुदुर्ग : गेल्या दोन दिवसापासून राज्यात सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावली आहे. कोकणात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी इशारा पातळी देखील गाठली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील पावसाने जोर धरला असून गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 240.3 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 155.0 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 1103.9 मि.मी. पाऊस झाला आहे. देवगड वगळता सर्वच तालुक्यात पावसाने शतक पार केले आहे.तालुका निहाय पावसाची आकडेवारी, कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे
देवगड-80.8 (1043.6), मालवण-145.8 (1111.6), सावंतवाडी-190.0 (1263.8), वेंगुर्ला-193.7 (1116.4), कणकवली-148.1 (977.7), कुडाळ- 138.8(1135.2), वैभववाडी-240.3 (1117.9),दोडामार्ग-187.0(1106.1) असा पाऊस झाला आहे.जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळीतिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.200 मी. आहे. कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 6.500 मीटर. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 5.800 मीटर. कणकवली-वागदे, राष्ट्रीय महामार्ग 66 पूलाजवळ गडनदीची पातळी 35.400 मीटर इतकी असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळाने दिली आहे.जिल्ह्यात धरण क्षेत्रातील पाणीसाठातिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात सध्या 272.666 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 60.95 टक्के भरले आहे. तर, मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात.मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर-38.6170, अरुणा -2.8133, कोर्ले- सातंडी -25.4740लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा - शिवडाव-1.509,नाधवडे-1.100,ओटाव-0.225, देंदोनवाडी – 0.546, तरंदळे -1.500, आडेली-0.658, आंबोली – 1.558, चोरगेवाडी– 1.360, हातेरी-1.963, माडखोल -1.690, निळेली -1.747, ओरोस बुद्रुक-0.786, सनमटेंब-1.685, तळेवाडी- डिगस-0.647, दाभाचीवाडी-1.076, पावशी-2.468, शिरवल -1.589, पुळास -1.391, वाफोली – 0.832, कारिवडे – 0.704, धामापूर – 0.991, हरकूळ -2.380, ओसरगाव – 0.480, ओझरम – 1.819, पोईप – 0.776, शिरगाव – 0.201, तिथवली – 0.857, लोरे-2.570मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा - विलवडे-0.888, शिरवळ-0.328, वर्दे-0.000, कोकीसरे-0.050, नानीवडे-0.050, सावडाव-0.060, जानवली-0.050 या प्रमाणे आहे.