सावंतवाडी : वेळागर येथे होणार्या पंचतारांकीत प्रकल्पाला ज्या शेतकर्यांची अधिकची जमिन अधिग्रहीत केली जात आहे. त्यांना वगळण्यात यावे याबाबत योग्य तो निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या महिला नेत्या अर्चना घारे यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली.दरम्यान या प्रकल्पाला कोणाचा विरोध नाही. परंतू अधिकच्या जमिनी घेतल्या जात आहेत. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेचा प्राधान्याने विचार करण्यात यावा, अशी ही मागणी त्यांनी मागणी यावेळी केली आहे. घारे यांनी तेथील शेतकर्यांना घेवून नुकतीच शरद पवार यांची मुंबई येथील त्याच्या निवास्थानी भेट घेतली. यावेळी माजी सभापती जयप्रकाश चमणकर, शेतकरी संघटना अध्यक्ष राजू आंदुर्लेकर, सचिव हनुमंत गवंडी, भाऊ आंदुर्लेकर, गजानन गवंडी, शेखर नाईक, संजय आरोसकर, तातू आंदुर्लेकर, प्रकाश गवंडी, महेश आंदुर्लेकर, चंद्रकांत नाईक उपस्थित होते.वेळागर येथे ताजचा पंचतारांकीत प्रकल्प येणार आहे. मात्र शेतकर्यांची अधिकची जमिन अधिग्रहीत केली जात आहे. त्यावरून शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत या अधिकच्या जमिनी वगळण्यात याव्यात अशी मागणी हे शेतकरी करत असून त्यांनी अर्चना घारे-परब याच्या माध्यमातून शरद पवार यांची भेट घेतली असून यावर तोडगा काढण्याची मागणी केली.
'वेळागरात होणार्या पंचतारांकीत प्रकल्पासाठी घेतलेली शेतकऱ्यांची अधिकची जमीन वगळा'
By अनंत खं.जाधव | Published: November 23, 2023 5:51 PM