शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
3
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
4
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
5
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
6
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
7
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
8
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
9
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
10
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
11
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
12
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
13
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
14
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
15
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
16
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
17
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
18
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
19
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
20
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले

मुलांना मिळाली शाळाबाहेरच्या जगाची अनुभूती

By admin | Published: May 04, 2016 11:14 PM

‘धमाल शाळा’ उपक्रमाचा सावंतवाडीत समारोप : पहिल्यांच उपक्रमाला विद्यार्थी-पालकांचा उत्तम प्रतिसाद, व्यक्तिमत्व विकासासह उद्योगाभिमुख प्रयोगातून सामजिक भान

राजन वर्धन--  सावंतवाडी  --विद्यार्थ्यांचे शिक्षण हे बहुतांशी शिक्षकावरच अवलंबून असते. पण सध्याच्या शिक्षकाला शासनाची असणारी दैनंदिन कामे आणि तीही आॅनलाईन करावी लागत असल्याने शिक्षणापासून शिक्षकच दुरावत चालल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. अशा परिस्थितीत मुलांच्या दर्जेदार व सर्वांगीण शिक्षणासाठी पालकांची धडपड सुरू असते. ही गरज ओळखून सावंतवाडीमध्ये ‘धम्माल शाळा’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये मुलांच्या व्यक्तिमत्व विकासावर विशेष भर देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यामुळे मुलांना शाळा बाहेरच्या जगाची नवी अनुभूती मिळण्यास मोठी मदत झाली. तर सावंतवाडी शहरात राबविलेल्या या वेगळ्या व पहिल्याच उपक्रमाला शहरातून २५ मुलांचा सहभाग मिळाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समविचारी व पुरोगामी विचार मानणाऱ्या सर्व-संस्था संघटनांच्या माध्यमातून सावंतवाडीत गतवर्षी ‘आम्ही भारतीय’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील पन्नास मान्यवरांचा समावेश आहे. या संस्थेमार्फत शालेय मुलांसाठी व तरूणाईसाठी सामाजिक जाणीवेची, बंधुभावाची व सामाजिक भानाची प्रचिती येण्याच्या हेतूने विविध कार्यक्रम राबविण्याचे कार्य केले जाते. प्रासंगिक उपक्रमाबरोबरच भवितव्याच्या दृष्टीने विविध व्याख्याने, सामाजिक बदलाच्या विविध घटनांवर चर्चात्मक वाद-संवादाचे कार्यक्रम घेतले जातात. यंदा या संस्थेमार्फत शालेय मुलांच्या सुटीच्या काळात ‘धमाल शाळा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. धम्माल शाळा या उपक्रमांतर्गत मुलांना कारिवडे-सावंतवाडी येथे निवासाची सोय करून विविध शारीरिक व बौध्दिक खेळ, गाणी, वैज्ञानिक प्रयोग, गणितातील गमती-जमती, पक्षीनिरीक्षण, आकाशदर्शन, हस्तकला, पर्यावरण संवर्धन अशा मूल्यवर्धक घटकांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेण्यात आला. उपक्रमाचे आयोजन अ‍ॅड. संदीप निंबाळकर, सोनाली निंबाळकर, राजश्री टिपणीस, राहुल टिपणीस व प्रविण बांदेकर व हरिहर वाटवे यांनी केले होते. उपक्रमाचे संयोजक म्हणून नीला आपटे (सावंतवाडी), प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रज्ञा अभ्यंकर (कोल्हापूर) व श्रध्दा भारतीय (गोवा) यांनी काम केले. या उपक्रमाला तामिळनाडू येथील ‘मरूदम’ या प्रयोगशील शाळेमध्ये काम करणारे कार्तिक व माया, केरळचे पत्रकार अजयकु मार, शिक्षिका मनीषा गुरव, सामाजिक कार्यकर्त्या अर्पिता मुंबरकर, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नृत्यांगना गौरी कुलकर्णी या मान्यवरांनी भेटी देऊन मुलांशी संवाद साधला. तर अ‍ॅड. देवदत्त परूळेकर, मंगल परूळेकर, विजय फापर्तेकर, प्रा. सुभाष गोवेकर, सोनाली ओगले, आनंद देवळी, प्रा. स्मिता खानोलकर, प्रा. विजया सावंत, शिरीष बांदेकर आदी मान्यवरांनी शिबिराला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या उपक्रमाच्या माध्यमातून शाळेबाहेरच्या जगाची अनुभूती मुलांना देणारी, मुलांचे भावविश्व समृध्द करणारी केंद्रे स्थापन होतील. तसेच आपला परिसर, पर्यावरण, समाज, स्वावलंबन या विषयीचे भान येऊन बांधिलकीची भावना निर्माण होईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. कारिवडे येथील जयश्री व आप्पाजी गावडे यांनी आपले राहते घर व परिसर आणि इतर सर्व सुविधा य उपक्रमासाठी उपलब्ध करून दिल्या. मुलांच्या गुणवत्ता विकासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल गावडे यांनीही धन्यवाद मानले. धमाल शाळा हा उपक्रम तसा जिल्ह्यामध्ये प्रथमच राबविण्यात आला. यामध्ये मुलांच्या व्यक्तिमत्व विकासावर भर देण्यात आला. मुलांना पुस्तकी ज्ञानापेक्षा बाह्य जगातील वास्तव ज्ञानाची अत्यंत गरज आहे. त्यामुळेच या उपक्रमांतर्गत उद्योगाभिमुख, रोजगाराभिमुख लघु प्रयोग राबविण्यात आले. भविष्यात या उपक्रमाचा विस्तार वाढविण्याचा मानस आहे. - नीला आपटे, महिला कार्यकर्त्याशिक्षणाचा विचार करता विज्ञान-तंत्रज्ञानाच्या काळात शालेय मुलांचे शिक्षणही गतीमान झाले आहे. झटपट शिक्षण व झटपट रिझल्ट अशा प्रकारच्या शिक्षणाला सामाजिक वास्तवाचे भान कमी पडते. धमाल शाळा या उपक्रमातून मुलांना शाळाबाह्य जगाचे किंबहुना समाजातील वास्तवाचे भान जाणवून देण्याचा उपक्रम ही गरज पूरी करणारा ठरला. - प्रा. प्रवीण बांदेकर, प्रसिद्ध साहित्यिक तथा कवी