शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

‘भू-विकास’चे अस्तित्त्व संपुष्टात

By admin | Published: November 30, 2015 9:40 PM

केवळ तीनच कर्मचारी : तब्बल २५ कर्मचाऱ्यांना केले सेवामुक्त; वसुली सुरूच

रत्नागिरी : आर्थिक अडचणीत सापडल्याने रत्नागिरी जिल्हा कृषी व ग्रामीण विकास बॅँकेच्या (भू-विकास बॅँक) जिल्ह्यातील २५ कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बॅँकेच्या चार शाखा व मुख्य शाखा यामध्ये आता केवळ तीन कर्मचारी उरले आहेत. या बॅँकेचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. सुधीर मुनगंटीवार समितीच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आला. सेवामुक्त धोरणामुळे कर्मचारी आता बेकार झाले आहेत.जिल्ह्यात या बॅँकेच्या एकूण पाच शाखा कार्यरत आहेत. त्यात दापोली, चिपळूण, देवरूख व लांजा येथील चार तसेच रत्नागिरीतील मुख्य कार्यालय यांचा समावेश आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांच्या काळात राज्यभरातील जिल्हा कृषी व ग्रामीण विकास बॅँका आर्थिक संकटात सापडल्या. कर्जवाटपानंतर त्याची वसुलीच झाली नसल्याने हे आर्थिक संकट अधिक गडद झाले. अखेर या बॅँका शासनाकडून अवसायनात काढण्यात आल्या. रत्नागिरी जिल्हा कृषी व ग्रामीण विकास बॅँक १४ फेब्रुवारी २०१३ला अवसायनात काढण्यात आली होती. त्यानंतर पावणेतीन वर्षांनंतर कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्यात आले आहे. २० वर्षांपेक्षा कमी सेवा असलेले २ शिपाई व एक लिपीक यांना कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. कर्मचारी सेवामुक्त झाले तरी या बॅँकेचे काम हे कर्जवसुली होईपर्यंत सुरूच राहणार आहे. बॅँकेची स्थिती लक्षात घेऊन जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी महिनाभरापूर्वीच स्वेच्छानिवृत्ती मागितली होती. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना सेवामुुक्त करण्यात आले आहे. मात्र, या सेवामुक्त कर्मचाऱ्यांना त्यांचे निवृत्तीनंतरचे लाभ मिळणार की नाहीत, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्य शिखर बॅँकेने काही निधी दिला, तर त्यातून काही प्रमाणात हे लाभ सेवामुक्त कर्मचाऱ्यांना मिळू शकतील. मात्र, असा निधी मिळेल की नाही, याबाबत कोणतीच शाश्वती सध्यातरी नसल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)येणे ३ कोटी, देणे १० कोटी६२८ कर्जदारांकडे बॅँकेचे ८ कोटी रुपये येणे होते. मात्र, काही काळापूर्वी एकाच वेळी कर्ज रक्कम भरण्याची योजना (वन टाईम सेटलमेंट स्किम) जाहीर करण्यात आली. त्यामुळे आठ कोटींचे येणे आता ३ कोटींवर आले आहे. प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांचे देणे १० कोटींचे आहे. यात आर्थिक मेळ बसत नसल्याने अवसायनात असलेल्या या बॅँकेतील २० वर्षांवर अधिक सेवा झालेल्या २५ कर्मचाऱ्यांना २४ नोव्हेंबर २०१५ व ३० नोव्हेंबर २०१५ रोजी दोन टप्प्यात सेवामुक्त करीत असल्याचा लेखी निर्णय नोटीसीद्वारे कळविण्यात आला आहे. जिल्हा कृषी व ग्रामीण विकास बॅँक कर्मचाऱ्यांना सेवामुक्त केलेले असले तरी ज्या ६२८ जणांकडे बॅँकेचे ८ कोटींचे कर्ज आहे ते वसूल केले जाणार आहे. एकाचवेळी कर्ज रक्कम भरणा योजनेत भाग घेणाऱ्यांनाच कर्ज रकमेत सवलत आहे. या कर्जवसुलीसाठी हंगामी कर्मचारी घेण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यासाठी सेवामुक्त कर्मचाऱ्यांना काम करण्याची इच्छा असल्यास प्राधान्य दिले जाणार आहे.-राजेंद्र महाजन, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) रत्नागिरीसेवामुुक्तीनंतच्या लाभाची प्रतीक्षाकर्जवसुली करण्यासाठी बॅँकेचे कर्मचारी प्रयत्न करीत होते. गेल्या अनेक महिन्यांत या कर्मचाऱ्यांचे वेतनही थकीत आहे. आर्थिक ओढाताणीमुळे अनेक कर्मचारी कर्जबाजारी झाले आहेत. त्यांच्या परिवाराची अवस्था हलाखीची आहे. त्यामुुळेच केलेल्या सेवेचे निवृत्तीनंतरचे लाभ मिळावेत, अशी मागणी आहे.