सिंधुदुर्गनगरी : सावंतवाडी, मालवण व वेंगुर्ले या नगरपालिकांसाठी व नवनिर्वाचित देवगड-जामसंडे या नगरपंचायतींसाठी २७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. २८ नोव्हेंबरला मतदानाचा निकालही जाहीर होणार आहे. त्यानुसार सिंधुदुर्गमध्ये तत्काळ आचारसंहिता लागू झाली आहे. दरम्यान, निवडणुकांच्या घोषणांमुळे जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षांनी तसेच इच्छुकांनी निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने तयारीला सुरुवात केली आहे. सिंधुदुर्गमधील ‘क’ वर्ग असलेल्या वेंगुर्ले व सावंतवाडी नगरपालिकेची मुदत १८ डिसेंबरला, तर मालवण नगरपालिकेची मुदत २४ डिसेंबर २०१६ला संपत आहे. तसेच देवगड-जामसंडे ही नवीन नगरपंचायत अस्तित्वात येणार आहे. उद्या, बुधवारी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहेत. जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकांच्या पदाधिकाऱ्यांची वाहने जमा केली जाणार आहेत. त्यादृष्टीने प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. यावेळी नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडला जाणार आहे.
आचरा समुद्रात स्फोटसदृश आवाज
By admin | Published: October 18, 2016 12:32 AM