शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

बनावट मद्यनिर्मिती, रॅकेटचा पर्दाफाश

By admin | Published: March 06, 2016 10:44 PM

पाचजण अटकेत : सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

बांदा : राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या मुंबई येथील भरारी पथकाने मडगाव-गोवा येथे कारवाई करत भेसळयुक्त व बनावट मद्यनिर्मिती करणाऱ्या रॅकेटचा रविवारी पर्दाफाश केला. या बनावट मद्याची कोकण रेल्वेतून राजरोसपणे वाहतूक करत मुंबई व ठाणे परिसरात विक्रीकरण्यात येत होती. पथकाने या प्रकरणी मडगाव-गोवा येथे व्हिडिओ पार्लरवर छापा टाकून पाच लाख २७ हजार ८०० रुपये किमतीच्या बनावट दारूसह मद्याची निर्मिती करणाऱ्या पाच परप्रांतीय युवकांवर अटकेची कारवाई केली आहे. राज्य उत्पादन खात्याच्या पथकाने गोव्यात जाऊन मद्यनिर्मिती करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याची ही पहिलीच घटना आहे. गोवा हे बनावट व भेसळयुक्त मद्यनिर्मितीचे माहेरघर आहे. याठिकाणी छुप्या पद्धतीने मद्यनिर्मिती करून या मद्याची महाराष्ट्राच्या विविध भागात चढ्या भावाने विक्री करण्यात येते. यामागे मोठे रॅकेट कार्यरत असून, पोलीस व उत्पादन खाते यांना संशय येऊ नये, यासाठी या रॅकेटकडून दारू वाहतुकीसाठी कोकण रेल्वेचा वापर करण्यात येत होता. आठवड्यातून ठरावीक दिवशी कोकण रेल्वेतून मडगाव येथून मुंबई येथे पांडे व जितू नामक व्यक्ती बनावट दारूची तस्करी करीत असल्याची माहिती उत्पादन शुल्क खात्याच्या मुंबई येथील भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि. ४) ठाणे मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधून दारू वाहतूक होत असल्याची पक्की खबर मिळाल्याने ठाणे येथे कारवाई करण्यात आली. यामध्ये चार बॉक्स ओल्ड बिल एक्स्ट्रा स्पेशल व्हिस्कीचे २२ हजार १०० रुपये किमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला व दोघा आरोपींना पोलीस कोठडी सुनाविण्यात आली.या आरोपींकडे कसून चौकशी केली असता, बनावट मद्यनिर्मिती ही मडगाव-गोवा येथे करण्यात येत असल्याचे माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार निरीक्षक सुभाष जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह गोवा गाठले. गोवा पोलिसांच्या मदतीने तेथे सापळा रचला. संशय येऊ नये, यासाठी आरोपींनी याठिकाणी व्हिडिओ पार्लर सुरू असल्याचे पथकाला सांगितले. मात्र, पार्लरच्या मागील मोकळ्या जागेत बनावट दारूची निर्मिती करण्यात येत होती. पथकाने तेथील लक्ष्मण सुरेंद्र बहादूर थापा (वय २५, रा. आखी मडगाव रेल्वे स्टेशन, मूळ रा. नेपाळ), रवींद्र ऊर्फ अजय समजित मिश्रा (३५, रा. शिवआशीर्वाद बिल्डिंग, साईनाथ नगर, नालासोपारा-ठाणे, मूळ रा. उत्तर प्रदेश), भवन मुरजी गांधी (३६, रा. मडगाव), जितेंद्रसिंग देवेंद्रसिंग (२५, रा. मडगाव, मूळ रा. मध्य प्रदेश), सनी नरेश राजपूत (२२, रा. मडगाव, मूळ रा. उत्तर प्रदेश) या आरोपींना अटक करण्यात आली. सर्व आरोपींना ठाणे येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)