शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी मिळावी

By admin | Published: March 09, 2015 11:10 PM

आंबा, काजू बागायतदारांच्या संयुक्त बैठकीत निर्णय

वेंगुर्ले : अवकाळी पाऊस, लांबलेली थंडी यामुळे आंबा रिफ्लॉवरींग व फळगळ यामुळे आंबा व काजू यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सहकारी संस्था, वित्तीय संस्था व राष्ट्रीय बँकांकडून शेतकरी आंबा, काजू बागायतदारांना शंभर टक्के कर्जमाफी मिळावी. त्याचबरोबर शासनाकडून प्रति झाडाप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, असा एकमुखी ठराव मांडण्यात आला. आंबा व काजू बागायतदार शास्त्रज्ञ मंच यांची संयुक्त बैठक आंबा केंद्रात आंबा, काजू मंचचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली. यावेळी आंबा मंचचे अध्यक्ष दीपक कुबल, सचिव विलास ठाकूर, फळ संशोधन केंद्राचे सहयोगी डॉ. बी. आर. साळवी, वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. पूजा पाटील, किटक शास्त्रज्ञ ए. वाय. मुंज, प्रा. आर. एम. देशपांडे, सदाशिव आळवे, शिवराम आरोलकर, शंकर नाबर, किशोर तुळसकर, सुरेश धुरी, सखाराम ठाकूर, विष्णू राऊळ, अशोक परब, चंद्रकांत कावडे, चंद्रकांत गडेकर, हनुमंत आंगचेकर, संतोष शेटकर, संतोष राऊळ, काशिनाथ आंगचेकर, देवेंद्र आंगचेकर, अरुण घोगळे, अनिल मोर्ये, राजन गावडे, जगदीश चमणकर, अनंत मोर्ये, सच्चिदानंद आंगचेकर, भालचंद्र परब, प्रवीण सातार्डेकर, यशवंत मठकर, विलास चव्हाण आदी बागायतदार उपस्थित होते. प्रथम सचिव विलास ठाकूर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून कार्यवाही केली. यावेळी वेंगुर्ले तालुका आंबा व काजू उत्पादक सहकारी संघ निर्माण करण्याचे निश्चित करण्यात आले. सध्या अवकाळी पावसामुळे फळमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने रक्षक सापळे फळ केंद्राकडून शेतकऱ्यांना द्यावेत. परंतु त्याकरिता जिल्हा परिषद कृषी विभाग, आत्मा व कृषी विभाग यांच्याकडून रक्षक सापळ्यांकरिता ५० टक्के अनुदान उपलब्ध करून द्यावे. आंबा फवारणीकरिता पॉवर स्प्रेअरयाकरिता सबसीडी कोट्यातून शासनाने बागायतदारांना परमिट देऊन सबसीडीचे जादा रॉकेल पुरवावे, याकरिता पुरवठा विभाग व तहसीलदार यांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी आंबा कॅनिंगकरिता ५० रुपये किलो हमीभाव निश्चित करावा, शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई करारावर आंबे घेणाऱ्यांना मिळावी. (वार्ताहर)