कणकवली : आचरा विविध कार्यकारी सोसायटीच्या अंतर्गत येणाºया अनेक सर्वसामान्य शेतकरी सभासदांना फटका बसला आहे. या संस्थेचे दप्तर (रेकॉर्ड) गहाळ झाल्याने कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकºयांचे आॅडिट करता न आल्यामुळे सुमारे ४२५ शेतकºयांचे सुमारे एक कोटी पंचवीस लाख रुपयांचे कर्जमाफीच्या रकमेचे नुकसान होत आहे. यासाठी आचरा सोसायटी संचालकांनी जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर यांची ओरोस येथे भेट घेऊन त्यांना याबाबत तोडगा काढण्याची विनंती केली.या ४२५ शेतकºयांपैकी ज्या ११६ शेतकºयांचे जिल्हा बँकेच्या तपशीलावरुन आॅडिट करता येईल त्या शेतकºयांचा प्रश्न तातडीने सोडविण्यात येईल व उर्वरीत शेतकºयांच्या रेकॉर्डसाठी आॅडिट विभाग, सहकार खाते यांचे रेकॉर्ड तपासण्याचे आदेश तातडीने देण्यात येतील असे आश्वासन यावेळी काळसेकर यांनी दिले.
यावेळी अतुल काळसेकर यांच्यासोबत जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, वरिष्ठ अधिकारी के. पी.चव्हाण तसेच सोसायटीचे अध्यक्ष कुबल, वझे यांच्यासोबत आचरा येथील शेतकºयांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.