मालवण : येथील पालिकेच्या मनमानी गैरकारभाराविरोधात आपण दोघे ५ एप्रिलपासून पालिका कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार आहोत. प्रशासन, मुख्याधिकारी व नगराध्यक्ष हे शहरातील समस्या सोडविण्यात अपयशी ठरल्याने या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी उपोषणाचा निर्णय घेतला आहे, उपनगराध्यक्ष राजन वराडकर व गटनेते गणेश कुशे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.अपूर्णावस्थेतील भुयारी गटार योजना, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सबाबत धर्मादाय आयुक्तांचे गहाळ झालेले पत्र, आरोग्याची समस्या व भाजी मंडईतील अनधिकृत गाळ्यांचा प्रश्न आदी समस्यांबाबत उपनगराध्यक्ष वराडकर व कुशे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्या पत्रानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र मुख्याधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे वराडकर व कुशे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.भुयारी गटार योजनेला १३ वर्षे उलटली तरी योजना अपूर्णावस्थेत आहे. प्रशासनाने ठेकेदाराला पाच कोटीचे बिल अदाही केले. ठेकेदार प्रशासनाला खेळवत आहे. ठेकेदाराचे उर्वरित ३५ ते ४० लाखांच्या बिल योजना पूर्ण झाल्याशिवाय अदा करू नये, असे लेखी पत्र दिल्याचे वराडकर व कुशे यांनी सांगितले.भाजी मंडईतील एका गाळेधारकाला सूट दिली गेली त्याच्यावर कारवाई का नाही? मासळी मंडई व सार्वजनिक ठिकाणचा कचरा महिनाभर उचललाच गेला नाही. जनतेचे फोन नगरसेवकांना येत आहेत. याबाबत मुख्याधिकाऱ्यांनी मुदत मागूनही अद्याप कारवाई केली नाही.कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार संबंधित ठेकेदारांनी रखडवले आहेत. याबाबत कामगारांना मुख्याधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे आरोग्यविषयी मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व प्रशासन यापैकी दोष कोणाला द्यावा, असा सवाल वराडकर यांनी केला.लोकप्रतिनिधींचा आवाज दडपला जातोयजनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. याची उत्तरे सभागृहात प्रशासन, मुख्याधिकारी, नगराध्यक्ष यांच्याकडून दिली जात नसल्याने आणि सभागृहात वारंवार लोकप्रतिनिधींचा आवाज दडपला जातो. यावर ठोस भूमिका घेण्यासाठी आपण आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे वराडकर, कुशे यांनी सांगितले.
मालवण नगरपालिकेच्या कारभाराविरोधात उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 12:37 PM
Malvan Muncipalty Sindhudurg- मालवण येथील पालिकेच्या मनमानी गैरकारभाराविरोधात आपण दोघे ५ एप्रिलपासून पालिका कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार आहोत. प्रशासन, मुख्याधिकारी व नगराध्यक्ष हे शहरातील समस्या सोडविण्यात अपयशी ठरल्याने या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी उपोषणाचा निर्णय घेतला आहे, उपनगराध्यक्ष राजन वराडकर व गटनेते गणेश कुशे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
ठळक मुद्देमालवण नगरपालिकेच्या कारभाराविरोधात उपोषण समस्या सोडविण्यात अपयशी : वराडकर, कुशे यांची माहिती