ओरोस : व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची पाश्चात्त्य संस्कृती मोडीत काढून १४ फेब्रुवारी हा दिवस मातृ-पितृ दिन म्हणून साजरा करण्यात यावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.गेल्या काही वर्षांत १४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करण्याची प्रथा भारतात रूजू झाली. प्रेमाच्या नावाखाली या संकल्पनेमुळे युवा पिढी अनैतिकतेकडे ओढली जात आहे, असा आरोपही या हिंदू जनजागृती समितीने केला आहे. यातूनच एकतर्फी प्रेम, मुलींची छेडछाड आणि हिंसक कृत्ये घडल्याच्या घटना घडत आहेत.या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी यामध्ये बदल होणे अपेक्षित असल्याचे मत समितीने व्यक्त केले आहे. काही समाजसेवी संघटनांनी माता-पित्यांना एकत्र आणून त्यांचे पूजन करण्याचा एक आदर्श पर्याय समोर ठेवला आहे. सद्य:स्थितीत अपत्यांकडून देखभाल होत नसलेल्या वृद्धांची संख्या झपाट्याने वाढत आहे.या सामजिक समस्येबाबत शासनही चिंतातूर आहे. याबाबतचे निवेदन सामान्य प्रशासनाच्या उपजिल्हाधिकारी रोहिणी रजपूत, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांना सादर करण्यात आले आहे. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे संदेश गावडे, डॉ. अशोक महिंद्रे, रवींद्र परब, सुरेश दाभोळकर, आदी उपस्थित होते.सौजन्य देण्याची भावना वाढेलशासनाने मातृ-पितृ पूजन दिनास प्रोत्साहन दिल्यास आपल्या माता-पित्यांना सन्मान व सौजन्य देण्याची भावना वाढीस लागेल. त्यामुळे सामाजिक परिवर्तनाची गरज असलेल्या या मातृ-पितृ पूजन दिनाला शासनस्तरावरून प्रोत्साहन देत १४ फेब्रुवारी हा दिवस मातृ-पितृ पूजन दिन म्हणून साजरा करण्यात यावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.
१४ फेब्रुवारी हा दिवस मातृ-पितृ दिन म्हणून साजरा करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 5:10 PM
व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची पाश्चात्त्य संस्कृती मोडीत काढून १४ फेब्रुवारी हा दिवस मातृ-पितृ दिन म्हणून साजरा करण्यात यावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
ठळक मुद्दे१४ फेब्रुवारी हा दिवस मातृ-पितृ दिन म्हणून साजरा करावा हिंदू जनजागृती समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी