शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

वेंगुर्लेतील मच्छिमारांचे धरणे

By admin | Published: December 26, 2016 11:50 PM

समुद्रात ठिय्या : पर्ससीन मासेमारीवर कारवाईची मागणी

वेंगुर्ले : सागरी भागात राजरोसपणे सुरू असलेल्या मिनी पर्ससीन मासेमारीवर कारवाई करण्यास शासनाचा मत्स्य विभाग टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या निषेधार्थ वेंगुर्ले बंदर येथील समुद्रात वेंगुर्ले तालुका पारंपरिक मच्छिमार संघटनेच्यावतीने सोमवारी भव्य लाक्षणिक धरणे आंदोलन छेडले. या आंदोलनात मच्छिमारांनी मोठ्या संख्येने सहभागी घेत मिनी पर्ससीनबाबतची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.‘एक रुपयाचा कडीपत्ता-पालकमंत्री झाले बेपत्ता, समुद्र आमच्या हक्काचा-नाही कुणाच्या बापाचा’ अशा घोषणांनी सोमवारी वेंगुर्ले बंदर दणाणून गेले. पर्ससीन मासेमारीवर कडक कारवाई न केल्यास २६ जानेवारीला जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा वेंगुर्ले पारंपरिक मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष दत्ताराम रेडकर यांनी मत्स्य विभागाच्या प्रभारी सहायक आयुक्त यांना इशारा दिला असून, सागरी भागातील अतिक्रमण थांबविण्यासाठी तहसीलदार यांनी फौजदारी गुन्ह्याची तरतूद करावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.वेंगुर्ले बंदर येथील या आंदोलनात नॅशनल फिश वर्कर फोरमनचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व भाजप मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष रविकिरण तोरसकर, मालवण येथील नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे रमेश धुरी, आचरा बंदर संघटनेचे अध्यक्ष नारायण कुबल, आचरा महिला मच्छिमार नेत्या आकांक्षा कांदळगांवकर, वेंगुर्ले तालुका पारंपरिक मच्छिमार संघटना अध्यक्ष दत्ताराम रेडकर, ज्येष्ठ मच्छिमार नेते जयहरी कोचरेकर, अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष खलिल वस्त, श्रमिक मच्छिमार संघटनेचे मिथून मालवणकर, संजय केळुसकर, भाऊ मोर्जे, मूठ मच्छिमार सोसायटीचे चेअरमन सुभाष गिरप, केळूस सहकारी संस्था सदस्य गुरू जोशी, वेंगुर्ले तालुका मच्छिमार संघटना सल्लागार हेमंत गिरप, रामचंद्र राऊळ, भाग्यवान गिरप, दशरथ कुर्ले यांच्यासह जवळपास २०० हून अधिक पारंपरिक मच्छिमारांनी सहभाग घेतला होता. सकाळी आंदोलनाला सुरुवात होण्यापूर्वी समुद्रात आपले ट्रॉलर्स उभे करून ठेवत काळे झेंडे दाखवून प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. त्यानंतर आंदोलनाला सुरुवात झाली. मात्र, आंदोलन सुरू होऊनही प्रशासनाचा एकही अधिकारी तसेच तहसीलदार आंदोलनस्थळी दाखल झाले नसल्याने मच्छिमारांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आश्वासन दिल्यानंतर सुद्धा पर्ससीनवर अद्यापपर्यंत ठोस कारवाई झालेली नाही. पालकमंत्र्यांनी मच्छिमार संघटना व त्यांच्या मागण्यांकडे पूर्णत: दुर्लक्ष केले. याबाबतही आंदोलनात त्याचा समाचार घेण्यात आला. आंदोलनावेळी महिला मच्छिमार यांनी भर उन्हात बसून आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. पोलिस निरीक्षक मधुकर आभाळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनस्थळी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वेंगुर्लेचे नायब तहसीलदार बांदेकर यांनी आंदोलनाला भेट दिली. (प्रतिनिधी)