कणकवली : तालुक्यातील वाघेरी येथील ग्रामदैवत श्री लिंगेश्वर व श्री पावणादेवीचा वार्षिक जत्रोत्सव बुधवारी २५ डिसेंबर रोजी होणार आहे. यानिमित्त सकाळपासूनच विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.वाघेरी येथील जत्रोत्सवाच्या निमित्ताने मुंबईकर मंडळी गावात दाखल झाले आहेत. माहेरवासिनी श्री पावणादेवीची ओटी भरण्यासाठी माहेरी आल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण गावच गजबजुन गेले असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.यात्रोत्सवाच्या दिवशी सकाळपासूनच ग्रामदेवतांच्या दर्शनासाठी मंदिरात भाविक गर्दी करीत असतात. माहेरवासिनी देवीची ओटी भरण्यासाठी मोठ्या संख्येने मंदिरात येतात. यात्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते. ती लक्षवेधी अशीच असते.तर रात्री ११ वाजल्यानंतर देवतरंगांसह वाजत गाजत,हरीनामाच्या गजरात श्री लिंगेश्वराची भेट घेण्यात येते.त्यानंतर जत्रोत्सवाच्या निमित्ताने रात्री ग्राम देवतांच्या तरंगासह मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर कवठी येथील श्री गोरे दशावतार नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग होतो. त्यानंतर या जत्रोत्सवाची सांगता होते.दरम्यान, या उत्सवाची जय्यत तयारी सुरु असून मंदिर परिसरात मंगळवारी विविध खाद्य पदार्थ विक्रेते तसेच साहित्य विक्रेते आपली दुकाने थाटताना दिसत होते.
वाघेरी येथील जत्रोत्सव बुधवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 3:54 PM
कणकवली तालुक्यातील वाघेरी येथील ग्रामदैवत श्री लिंगेश्वर व श्री पावणादेवीचा वार्षिक जत्रोत्सव बुधवारी २५ डिसेंबर रोजी होणार आहे. यानिमित्त सकाळपासूनच विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ठळक मुद्देवाघेरी येथील जत्रोत्सव बुधवारी ग्रामदैवत श्री लिंगेश्वर व श्री पावणादेवीचा वार्षिक जत्रोत्सव