सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दोडामार्ग-वेंगुर्ला-सावंतवाडी या विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी बबन साळगांवकर आणि अर्चना घारे-परब यांनाही एबी फॉर्म देण्यात आले होते. पक्षाने अर्चना घारे यांना नजरचुकीने फॉर्म दिल्याचे निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांना कळविल्यामुळे घारे यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. दरम्यान, पक्षाने घारे यांना अर्ज मागे घेण्याचे आवाहन केले, त्यामुळे अर्चना घारे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज मागे घेतला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दोडामार्ग-वेंगुर्ला-सावंतवाडी या विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी दोन एबी फॉर्म देण्यात आले होते, त्यातील एक बबन साळगांवकर यांना तर दुसरा अर्चना घारे-परब यांना देण्यात आला होता. त्यामुळे पेच निर्माण झाला होता, मात्र पक्षाने घारे यांना अर्ज मागे घेण्याचे आवाहन केले, त्यामुळे अर्चना घारे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज मागे घेतला.दरम्यान, पक्षाचा आदेश आपण पाळला असून यापुढे राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्यास कोणतीही कसर ठेवणार नाही असे आश्वासन अर्चना घारे यांनी दिले आहे. दीपक केसरकर यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीमार्फत सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. यासाठी साळगावकर यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.साळगावकर हे केसरकर यांचे जवळचे मानले जातात.मात्र त्यानी केसरकर यांच्या विरुद्ध दंड थोपटून राष्ट्रवादीतर्फे आपली जाहीर उमेदवारी केल्याने या मतदारसंघात रंगतदार लढत होण्याची अपेक्षा आहे.दत्ता सामंत यांच्या अर्जावर निर्णय प्रलंबितदरम्यान, कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघातुन अपक्ष उमेदवार दत्ता सामंत यांच्या उमेदवारी अर्जावर ६ वाजता निवडणूक अधिकारी निर्णय देणार आहेत.दत्ता सामंत यांच्या उमेदवारी अर्जावर आमदार वैभव नाईक यांनी आक्षेप घेतला आहे. दत्ता सामंत यांनी दोन तासांची वेळ मागितल्याने उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक अधिकारी वंदना खरमाळे-मांडगे या सायंकाळी ६ च्या दरम्यान निर्णय देणार आहेत.
Maharashtra Vidhan Sabha 2019: अखेर अर्चना घारे परब यांचा उमेदवारी अर्ज मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 4:36 PM
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दोडामार्ग-वेंगुर्ला-सावंतवाडी या विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी बबन साळगांवकर आणि अर्चना घारे-परब यांनाही एबी फॉर्म देण्यात आले होते. पक्षाने अर्चना घारे यांना नजरचुकीने फॉर्म दिल्याचे निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांना कळविल्यामुळे घारे यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. दरम्यान, पक्षाने घारे यांना अर्ज मागे घेण्याचे आवाहन केले, त्यामुळे अर्चना घारे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज मागे घेतला.
ठळक मुद्देअखेर अर्चना घारे परब यांचा उमेदवारी अर्ज मागेदत्ता सामंत यांच्या अर्जावर निर्णय प्रलंबित