शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
3
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
4
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
5
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
6
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
8
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
9
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
10
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
11
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
12
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
13
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
14
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
15
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
16
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
17
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
18
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
19
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
20
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार

...अखेर ‘त्या’ युवतीला अटक

By admin | Published: March 29, 2016 10:27 PM

केदार गावकर मृत्यूप्रकरण : आज न्यायालयात हजर करणार

मालवण : शहरातील सामाजिक कार्यकर्ते केदार गावकर मृत्यूप्रकरणी मालवण पोलिसांनी रामेश्वर कॉम्प्लेक्स येथील तेजस्विनी संजय खडपे (वय २३, मूळ रा. विठ्ठलवाडी-देवगड) हिच्यावर मालवण पोलिसांनी भादंवि कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अखेर मंगळवारी सायंकाळी चौकशीअंती तेजस्विनी हिला अटक करण्यात आली असून तिला बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.दरम्यान, केदार याची पत्नी करुणा केदार गावकर हिने दिलेल्या तक्रारीनुसार तेजस्विनी हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे तक्रारीनुसार पुढील तपास करण्यात येणार आहे. तसेच संशयित युवतीप्रमाणेच साक्षीदाराही तपासात महत्वाचे असणार आहेत. केदार आणि तेजस्विनी यांच्यातील कॉल डिटेल्स तपासण्यात येणार आहे. त्यामुळे गुलदस्त्यात अडकलेल्या केदार गावकर मृत्यूप्रकरणाला वेगळी दिशा मिळणार आहे. मात्र असे असले तरी पोलिसांनी मात्र ती आत्महत्याच असल्याचे स्पष्ट केले आहे.मालवण-वेंगुर्ले सागरी महामार्गावरील देवली येथील माळरानावर रविवारी मालवण येथील सामाजिक कार्यकर्ते केदार गावकर (वय ३५) यांचा गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला होता. केदार याच्या या मृत्यूनंतर दोन दिवस मालवणात उलटसुलट चर्चा सुरु होत्या. त्यानंतर आज केदार याची पत्नी करुणा केदार गावकर (३०) हिने आज मालवण पोलीस ठाण्यात तेजस्विनी संजय खडपे हिच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी चौकशीअंती गुन्हा दाखल करून अटक केली. मानसिक दबावातून आत्महत्याकेदार याची पत्नी करुणा गावकर यांनी दिलेल्या तक्रारीत ती युवती केदार याच्याकडे लग्नासाठी दडपण तसेच सतत केदारकडे लग्न आणि वस्तू, पैशांची मागणी करायची. केदार आणि तेजस्विनी यांचे अडीच वर्षापासून प्रेमप्रकरण होते. दीड वर्षापूर्वी आपल्याला हे समजल्यावर तिला दोन वेळा समजही दिलेली होती. त्यांचे प्रेमकरण थांबबे यासाठी केदार यांनी शपथही घेतली होती. मात्र त्यांचे प्रेमसंबंध सुरूच होते. केदार याच्याकडे ती वारंवार लग्नाची मागणी करत होती तसेच पैसे, वस्तू यांचीही मागणी करत असे. या मानसिक दबावातून केदार याने आत्महत्यासारखे कृत्य केले, असे त्यांनी म्हटले आहे. तर केदार याने दिलेले सर्व साहित्य पोलिसांनी ताब्यात घ्यावे, अशी त्यांनी मागणी केली आहे. करूणा गावकर यांच्या तक्रारारीनुसार संशयित तेजस्विनी यांच्यासह केदार याच्या मित्रपरिवाराचीही चौकशी करण्यात येणार आहे. केदार याच्या नावावर असलेले गाड्यांवर कर्ज आहे. मात्र कर्जाचे हप्ते नियमित भरणा करत असल्याचे तक्रारीत म्हणत केदार याला आर्थिक दडपण नव्हते. याबाबत गावकर यांनी पोलिसांना बँक स्टेटमेंट सादर केले आहे. आता केदार याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिस तपासाची दिशा पूर्णपणे बदलली असून या प्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर येऊन पडले आहे. (प्रतिनिधी)पत्नीची तक्रार : तपासाची दिशा बदलणारकेदार याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार तपासाची दिशा ठरणार आहे. त्याच्या मित्रांचे जबाब नोंदवण्यात येणार आहेत. कॉल डिटेल्स तपासताना मोबाईलवरील संदेशही तपासण्यात येणार आहेत. करुणा यांच्या जबाबात केदार याला कोणतीही आर्थिक चणचण नव्हती. कर्ज व त्याचे अन्य आर्थिक व्यवहार पारदर्शक होते. असेही म्हटले आहे. त्यामुळे तेजस्विनीच्या कॉल डिटेल्स अथवा संदेशात पैशाची मागणी अथवा लग्नाचा तगादा लावल्याचे आढळल्यास तपासाची दिशा महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे दोन दिवस गुलदस्त्यात अडकलेल्या गावकर मृत्यूप्रकरणाचा तपास करणे मालवण पोलिसांना आव्हान आहे. याबाबत अधिक तपास उपनिरीक्षक डॉ. सागर वाघ करीत आहेत.