मालवण : झाडावरून पडून गंभीर जखमी झालेल्या निलेश लुडबे कुटुंबीयांना मालवण तालुका स्वाभिमानच्यावतीने आर्थिक मदतीचा हात देण्यात आला. सोमवारी लुडबे कुटुंबीयांना स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी आर्थिक मदत सुपुर्द केली.वायरी लुडबेवाडीतील निलेश लुडबे हे नारळाच्या झाडावरून पडल्यामुळे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या गोवा-बांबुळी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना उपचारांचा लाखो रुपये खर्च शक्य नाही.
याबाबत स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांना माहिती मिळताच स्वाभिमानच्यावतीने लुडबे कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली.यावेळी स्वाभिमानचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, महिला तालुकाध्यक्षा पूजा वेरलकर, नगरसेवक यतीन खोत, दीपक पाटकर, जगदीश गावकर, ममता वराडकर, लीलाधर पराडकर, दामू तोडणकर, आबा हडकर, सूर्यकांत फणसेकर आदी उपस्थित होते.