सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी १२ सप्टेंबरला चिपी विमानतळावर उतरविलेले विमान बेकायदेशीर होते. त्यांनी केवळ आपल्या हौसेखातर विमान उतरवले. केसरकर यांचा चिपी विमानतळाशी काहीही संबंध नसून ते केवळ जिल्हा नियोजन समितीपुरते पालकमंत्री आहेत. त्यामुळे खासगी विमान उतरवून घुसखोरी करणाऱ्या पालकमंत्र्यांवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, अशी भूमिका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा खासदार नारायण राणे यांनी घेतली.चिपी येथील सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड विमानतळाच्या धावपट्टी आणि प्रवासी टर्मिनलची गुरुवारी खासदार राणे यांनी पाहणी केली. या वेळी आयआरबीच्या अधिकाºयांकडून त्यांनी कामाचा आढावा घेत विमानतळ कामाचे तोंडभरून कौतुक केले. विमानतळाची पाहणी झाल्यानंतर खासदार राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, विमानतळ होण्यासाठी मंत्री असताना मी प्रयत्न केले. जमीन देण्यापासून विमानतळाला परवानगी मिळेपर्यंत पाठपुरावा केला. काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या दोन महिन्यांत विमानतळामधील कामे तसेच विमानतळाला जोडणारे रस्ते सुस्थितीत करण्याच्या सूचना अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत़
‘केसरकरांवर गुन्हा दाखल करा’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 6:19 AM