कणकवली : हरकुळबुद्रुक-देऊळवाडी येथील दिगंबर शंकर सोनवडेकर यांच्या झोपडीवजा घराला बुधवारी दुपारी दीड वाजुन्याच्या सुमारास अचानक आग लागली. स्थानिक ग्रामस्थांनी धावाधाव करून आग आटोक्यात आणली. मात्र आगीत पूर्णत: घर जळून खाक झाले. आगीमुळे घराचे सुमारे ३ लाख ५० हजाराचे नुकसान झाले आहे. दरम्यान , कणकवलीचे तहसीलदार आर.जे.पवार यांनी तातडीने हरकुळबुद्रुक येथे जावून नुकसानीची पाहणी केली.हरकुळबुद्रुक-देऊळवाडी येथील दिगंबर सोनवडेकर हे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. लाकडी छप्पर, पत्रे, कौले असे त्यांचे झोपडीवजा घर होते. बुधवारी दुपारी दिगंबर हे कामानिमित्त बाहेर गेले होते. पत्नी ही कामाला गेली होती. तर मुले शाळेत होती. अचानक घरातून आगीचा धूर येवू लागल्याने स्थानिक नागरीकांनी धावाधाव केली. स्थानिक ग्रामस्थ बाळा घाडीगावकर, भुषण वाडेकर, हरी गावकर, पप्पू घाडीगावकर, मंगेश वाडेकर आदींसह ग्रामस्थांनी जवळच्या एका विहिरीवरून पंपाने पाणी आणत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीमुळे दिगंबर सोनवडेकर यांचे सर्व जीवनावश्यक साहित्य जळून गेले.घराला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर माजी उपसभापती बुलंद पटेल, माजी उपसरपंच राजू पेडणेकर हे घटनास्थळी पोहोचले. तसेच याची माहिती मिळाल्यानंतर कणकवली तहसीलदार आर.जे. पवार, गटविकास अधिकारी मनोज भोसले, कणकवलीचे मंडळ अधिकारी एस.एम. नागावकर, हरकुळबुद्रुक तलाठी पी.व्ही. वळंजू, ग्रामसेवक दीपक तेंडुलकर, पोलिसपाटील संतोष तांबे आदींनी नुकसानीची पाहणी केली.
हरकुळबुद्रुक येथे घराला आग साडेतीन लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 10:07 AM
स्थानिक ग्रामस्थांनी धावाधाव करून आग आटोक्यात आणली. मात्र आगीत पूर्णत: घर जळून खाक झाले. आगीमुळे घराचे सुमारे ३ लाख ५० हजाराचे नुकसान झाले आहे. दरम्यान ,
ठळक मुद्देग्रामस्थांनी जवळच्या एका विहिरीवरून पंपाने पाणी आणत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र