कणकवली: कणकवली स्टेट बँके ऑफ इंडियाच्या सिलींगला ए.सी.असलेल्या ठिकाणी मंगळवारी दुपारी १२ वाजता शॉर्टसर्किट होऊन आग लागली. अचानक लागलेल्या या आगीमुळेबँकेतील कर्मचारी व ग्राहकांची तारांबळ उडाली.स्टेट बँकेच्या सिलिंग लागत असलेल्या एसीच्या इलेक्ट्रिक वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. वीज वितरण कनिष्ठ अभियंता एस.एस.कांबळी व रविकांत सातवसे यांनी त्वरित वीज पुरवठा खंडीत केला. यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. मात्र, या आगीमुळे बँक व्यवहार काही काळ स्थगित करण्यात आला होता.महावितरणचे वायरमन रविकांत सातवसे कामानिमित्त बँकेत आले होते. यावेळी त्यांना एसीच्या इलेक्ट्रिक वायरिंगमध्ये अचानक धूर येऊ लागल्याने निदर्शनास आले. तत्परतेने त्यांनी वरिष्ठ अधिकारी कांबळे यांना घटनेबाबत माहिती दिली. तसेच बँकेचा विद्युत पुरवठा तत्काळ खंडित केला. त्यामुळे मोठे नुकसान टळले.
कणकवली स्टेट बँकेत लागली आग, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 5:49 PM