शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

प्रकल्पासाठी बोट हलविली

By admin | Published: December 18, 2014 9:50 PM

परशुराम उपरकरांचा आरोप : कांदळवनाची सीडी न्यायालयाकडे

सावंतवाडी : आरोंदा येथे बांधण्यात येत असलेली जेटी अनधिकृत असून, न्यायालयाने या जेटीच्या कामाला स्थगिती दिली आहे. मात्र, न्यायालयाचा अवमान करून हे काम सुरू आहे. संबंधित कंपनीवर तत्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे अन्यथा ही बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात येईल, असा स्पष्ट इशारा माजी आमदार तथा मनसेचे कोकण नेते परशुराम उपरकर यांनी दिला आहे. तसेच जेटीला अडथळा होईल, या भीतीनेच पर्यटन हाऊस बोट तारकर्लीला हलविण्यात आल्याचा आरोपही यावेळी उपरकर यांनी केला आहे.ते सावंतवाडी येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब, संदीप खानविलकर, गोपाळ मोठे आदी यावेळी उपस्थित होते. उपरकर म्हणाले, आरोंदा येथे उभारण्यात येत असलेल्या जेटीला तत्कालीन उद्योग व बंदरमंत्री नारायण राणे यांनीच परवानगी दिली आहे. त्यावेळी त्यांनी परवानगी नाकारली असती, तर एवढा प्रकार घडलाच नसता, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आरोंदा येथील जेटी परिसरात कांदळवन असल्याचे पुरावे माझ्याकडे असून तशी व्हिडिओ चित्रफितही न्यायालयाला दिली असून न्यायालय यावर काय तो निर्णय घेईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.आरोंदा जेटीबाबत मनसेच्यावतीने जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांना सर्व परस्थिती सांगितली आहे. त्यांनी यापूर्वी यावर कारवाई करणे अपेक्षित होते. पण तसे झाले नाही. पर्यावरणाचे नियम डावलून हे काम सुरू आहे. तसेच जी भिंत घालण्यात आली आहे. ती बेकायदेशीर असून अशी भिंत घालणे मुळात चुकीचे असून राज्य महामार्गावर बांधकामचा निधी खर्च पडत असेल तर तो रस्ता अडवण्याचा अधिकार जेटीच्या मालकांना कोणी दिला, असा सवालही उपरकर यांनी उपस्थित केला.दीपक केसरकरांनीही या जेटीबाबत आपली भूमिका स्पष्ट करणे गरजेचे असून जर आरोंदा किरणपाणी पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याचे शासनाचे धोरण असेल तर याठिकाणी जेटीसारखे उद्योग आणून स्थानिकांना देशोधडीला का लावता तसेच जेटीमुळे मच्छीमारही विस्थापित होणार आहेत. त्यांचे पुनर्वसन कसे करणार, असा सवाल जिल्हाधिकाऱ्यांना केल्याचे परशुराम उपरकर यांनी यावेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)अहवाल येताच भिंत पाडण्याचे आश्वासनमनसेचे शिष्टमंडळ माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांना भेटले. यावेळी किरणपाणी बंदरालगत घालण्यात आलेल्या भिंतीमुळे स्थानिकांना ये जा बंद करावी लागत आहे. यावर जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असता, त्यांनी ही भिंत आम्ही काढणार असून अहवालाची वाट पाहत असल्याचे स्पष्ट केले. जेटीचे काम नियम धाब्यावर बसवूनवैभव नाईकांनी वेधले पर्यावरणमंत्र्याचे लक्षसावंतवाडी : आरोंदा येथे होत असलेली जेटीमुळे पर्यावरण नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत. या जेटीमुळे कांदळवनाची मोठ्या प्रमाणात तोड झाली. यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची भेट घेतली. त्यांना निवेदन सादर केले. यावर मंत्र्यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.आमदार नाईक यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, आरोंदा येथे जेटीचे काम सुरू असून, मोठ्या प्रमाणात कांदळवनाची तोड झाली आहे. उच्च न्यायालयाने कांदळवन तोडीवर बंदी घातली असतानाही ही तोड करण्यात आली आहे. परिसरातील कांदळवन नष्ट झाले तर मच्छीमारी धोक्यात येणार असून पर्यावरणाची हानी होणार आहे. त्याशिवाय परिसरातील बागायतीही नष्ट होणार आहे.तसेच या आरोंदा जेटीमुळे सीआरझेडचे उल्लंघन झाले आहे. मेरीटाईम बोर्डाकडे अपुरी कागदपत्रे असतानाही या प्रकल्पासाठी पर्यावरण परवानगी देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक जनतेत चिंतेचे वातावरण असून यावर तातडीने कारवाई व्हावी, अशी अपेक्षाही आमदार नाईक यांनी मंत्री कदम यांच्याकडे व्यक्त केली. त्यावर मंत्री कदम यांनी तातडीने या प्रकरणाचा अहवाल मागून घेण्यात येणार असून अपुरी कागदपत्रे असल्यास योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन दिले आहे. (प्रतिनिधी)आरोंदा जेटीचे बांधकाम थांबवावसंजू परब : सावंतवाडी तालुका काँग्रेसतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनेसिंधुदुर्गनगरी : आरोंदा येथे होत असलेल्या जेटीच्या बांधकामाविरोधात आरोंदा संघर्ष समितीच्यावतीने लढा सुरु असताना सुरु असलेले बेकायदेशीर काम तत्काळ थांबवावे. अनधिकृतरित्या बांधलेल्या भिंती पाडून टाकाव्यात अशी मागणी सावंतवाडी तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.सावंतवाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा गावामध्ये व्हाईट आर्किड कंपनी चेंबूर, मुंबई या कंपनीच्यावतीने प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशीपअंतर्गत आरोंदा येथे जेटीचे बांधकाम सुरु आहे. या जेटी प्रकल्पाच्या विरोधात आरोंदा येथील ग्रामस्थांची आरोंदा संघर्ष समिती न्यायालयात लढा देत आहे. प्रकल्पाविरोधात मुद्दा न्यायप्रविष्ठ असताना संबंधित कंपनी जेटीच्या ठिकाणी सातत्याने बेकायदेशीर बांधकाम करीत आहे. आरोंदा खाडी व लगतचा रस्ता यामध्ये कंपनीतर्फे अनधिकृतरित्या भिंत बांधण्यात आलेली आहे. त्यामुळे गावातील सामान्य नागरिकाला, ग्रामस्थांना खाडीच्या ठिकाणी जाण्याचा मार्ग बंद झालेला आहे.जेटी प्रकल्पापर्यंत जाणारा राज्यमार्ग क्र. १२३ कंपनीने बोल्डर व भिंत उभारून कायमस्वरूपी बंद करून कायद्याचे उल्लंघन केलेले आहे. जेटी प्रकल्पाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांदळवनाची तोड झालेली आहे. या जेटी प्रकल्पाच्या विरोधात आरोंद्यातील सर्व जनता व ग्रामस्थ संघर्ष करीत आहेत. जनतेमध्ये असंतोष आहे. तरी आरोंदा येथे सुरु असलेले जेटी प्रकल्पाचे काम बंद करावे. गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी आरोंदा संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश शिरोडकर, सरपंच आत्माराम आचरेकर, बाबा गावडे, मनोहर आरोंदेकर, सुधाकर नाईक, बबन पेडणेकर, गजानन तानवडे, निवृत्ती देऊळकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)काम बंद पाडण्याचा इशाराअनधिकृतरित्या बांधलेल्या भिंती पाडून संबंधित ग्रामस्थांचा खाडीकडे जाण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांच्याकडे केली आहे. जेटीचे काम तत्काळ बंद न झाल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरून राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने सुरु असलेले काम बंद पाडू, असा इशारा दिला आहे.