शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
3
Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?
4
ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
5
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
6
संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video
7
अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
8
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
9
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
10
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 
11
एलन मस्कही चक्रावले! टेस्लाच्या सायबर ट्रकची रशिया-युक्रेन युद्धात एन्ट्री; सात किमीपर्यंत गनचा मारा
12
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
13
'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला 
14
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
15
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
16
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
17
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
19
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
20
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा

सिंधुदुर्गातील आचऱ्यात गोळीबार, एक युवक जखमी; हल्लेखोरांना ग्रामस्थांनी पाठलाग करुन पकडले 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2023 5:02 PM

बेछूट गोळीबार आणि युवकावर झालेल्या प्राणघातक चाकू हल्ल्याने आचरे गाव हादरला

आचरा : बेछूट गोळीबार आणि युवकावर झालेल्या प्राणघातक चाकू हल्ल्याने आचरे गाव हादरला. हल्ला करणाऱ्या तिघा हल्लेखोरांना स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या शिताफीने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.सुरुवातीला आचरा तिठा येथे हल्लेखोर आणि आचरा पारवाडी, डोंगरेवाडी येथील युवकांची बाचाबाची झाली. त्यानंतर काही वेळातच हल्लेखोरांनी पारवाडी येथील युवकांची चारचाकी रामेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी आडवी घालत अडविण्याचा प्रयत्न करत चारवेळा गोळीबार केला. यावेळी गाडीत बसलेल्या गौरव पेडणेकर (पारवाडी) या युवकावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात गौरव याच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली.दरम्यान, गोळीबार व चाकू हल्ल्याच्या घटनेनंतर आचऱ्यात अतिरिक्त पोलिस अधीक्षक नितीन बगाटे व उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे दाखल झाले. आचरा आरोग्य केंद्राबाहेर झालेली गर्दी पोलिसांनी पांगवली. रात्री उशिरापर्यंत हल्लेखोरांविरोधात तक्रार देण्याची कार्यवाही सुरू होती. तसेच पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तिघा हल्लेखोरांची जबानी पोलिस घेत होते.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आचरा येथे बंधाऱ्याच्या कामाला अटकाव करणाऱ्याची सुपारी घेतल्याच्या संशयावरून तौकिर जुम्मन शेख (रा. आचरा) याच्याशी आचरा डोंगरेवाडी पारवाडीतील युवकांमध्ये आचरा तिठ्यावर वाद झाला. त्यानंतर संशयित तौकिर हा निघून गेला. काही वेळानंतर आणखी सहकारी घेऊन येत बाचाबाची करणाऱ्या युवकांच्या चारचाकीसमोर दुचाकी आडवी घालून जाब विचारत गोळीबार केला.याचदरम्यान चारचाकीमधील गौरव पेडणेकर या युवकाच्या डाव्या हातावर चाकू हल्ला करत दुचाकीवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पळून जात असताना त्यांची दुचाकी घसरली. दुचाकी तिथेच टाकून पळून जात असताना प्रत्यक्षदर्शिनी त्यांचा पाठलाग करत दोघांना पकडले.प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबार करणारा शुभम जुवाटकर (रा. दांडी मालवण) व दुचाकी चालवणारा प्रतिक हडकर (रा. चिंदर सडेवाडी) यांना जमावाने प्रसाद देत पोलिस येईपर्यंत पकडून ठेवले.घटनास्थळी चार पुंगळ्या आढळून आल्या होत्या. जमावाबरोबर झालेल्या झटापटीत जुवाटकर याच्याकडील रिव्हॉल्व्हर व चाकू रस्त्यावर पडलेले होते. तसेच घटनास्थळी पाकीट व चिलीम पडलेली होती. पोलिस निरीक्षक शंकर कोरे, अक्षय धेंडे, मनोज पुजारे, बाळू कांबळे हे घटनास्थळी दाखल होत संशयितांना ताब्यात घेत प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

मास्टरमाईंडला गजाआड करा

हल्लेखोर हे चरस गांजाच्या व्यवसायात गुंतलेले आहेत. पोलिसांनी हल्ल्याचा तपास करण्याबरोबर चरस गांजाचे रॅकेट चालवणाऱ्या या टोळीच्या मुळाशी जाऊन चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. या गोळीबारप्रकरणी आणखी कोणाचा हात असेल, त्यालाही पोलिसांनी गजाआड करावे, अशी मागणी उपस्थित धोंडी चिंदरकर, जेरोन फर्नांडिस, राजन गावकर, महेश राणे, बाबू कदम, अभिजित सावंत, मंदार सरजोशी, प्रशांत गावकर यासह ग्रामस्थांनी केली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस