शहरं
Join us  
Trending Stories
1
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
2
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
3
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
6
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
7
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
8
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
9
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
10
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
11
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
13
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
14
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
15
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
16
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
17
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
19
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
20
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...

दाभोळेतील ‘स्वीटकॉर्नर’वर प्रक्रिया देशातील पहिली यंत्रणा

By admin | Published: February 01, 2016 12:37 AM

जयंतीभाई भाडेसिया : जामसंडे येथील उद्घाटन समारंभात मार्गदर्शन

 देवगड : दाभोळे येथील आंबा फळ प्रक्रिया केंद्रामध्ये स्वीटकॉर्नवर प्रक्रिया करणारी पूर्णपणे स्वयंचलित असलेली ही यंत्रणा थायलंड येथून आयात केलेली असून देशातील ही पहिलीच यंत्रणा आहे. तसेच चांगले विचार समृद्ध जीवन घडवण्यास उपयोगी ठरतात, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्राचे संघचालक जयंतीभाई भाडेसिया यांनी व्यक्त केले. जामसंडे येथील देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेच्या तालुक्यातील दाभोळे येथील फळप्रक्रिया प्रकल्पात नीना अ‍ॅग्रोटेक या कंपनीने स्वीटकॉर्नवर प्रक्रिया करणारी स्वयंचलित यंत्रणा बसवली आहे. याचे उद्घाटन रविवारी भाडेसिया यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे, सुनील काळे, हसमुखभाई पटेल, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) अभिजीत पाटील, अ‍ॅक्सीस बँकेचे शिरीष भिवटे, प्रकाश अभ्यंकर, विद्याधर माळगांवकर आदी उपस्थित होते. यावेळी भाडेसिया यांचा अ‍ॅड. गोगटे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच संघाचे तालुक्यातील ज्येष्ठ स्वयंसेवक शांताराम कर्णिक, बाबूराव भुजबळ, शांताराम घाडी, धोंडू लांजवळ आदींचा भाडेसिया यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. भाडेसिया म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीने सकारात्मदृष्टया विचार करून आपल्या गुणांचा यशस्वीरित्या वापर केल्यास कुठल्याही क्षेत्रामध्ये मनुष्य कधीही मागे राहू शकत नाही. व्यक्तीगत स्वार्थ विसरून समाज पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील असणारे प्रसिद्धीपासून दूर असतात. कल्याणकारी समाज घडवण्यासाठी त्यागाची भावना आवश्यक असते. लोकांच्या कल्याणातच आपले कल्याण मानणारा समाज घडवणे गरजेचे आहे. सुदृढ समाज घडवण्यासाठी अंगी त्यागाची भावना असावी लागते. संघ ही एक निस्वार्थीपणे काम करणारी शृंखला आहे. जीवनात परिवर्तनाबरोबरच नवीन विचार आत्मसात केले पाहिजेत. निस्वार्थी माणसेच चांगले काम घडवत असल्याचे सांगितले. अ‍ॅड. गोगटे म्हणाले की, दाभोळे येथील फळ प्रक्रिया केंद्राच्या माध्यमातून बेबीकॉन प्रॉडक्टची आज परदेशवारी केली जाते. ग्रामीण भागातून अशा प्रकिया केंद्राच्या माध्यमातून परदेशवारी होणे म्हणजे ही एक फार मोठी कौतुकाची बाब आहे. तसेच स्वीटकॉर्नची अद्ययावत स्वयंचलित यंत्रणा ही थायलंडवरून आयात केली असून अशी ही यंत्रणा देशातील पहिलीच यंत्रणा असून ही यंत्रणा बसवण्याचा आढावा घेऊन आंब्याबरोबरच बेबीकॉर्न, स्वीटकॉर्नमुळे कायम फॅक्टरी सुरू राहून रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल असे सांगितले. यावेळी पाटील, अभ्यंकर, भिवटे आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला मिलिंंद केरकर, लालजीभाई पटेल, दिलीप देशमुख, प्रविण मणीयार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रेश्मा जोशी यांनी केले. आभार अजय जोशी यांनी मानले. (प्रतिनिधी)