मालवण : मच्छिमार हे नेहमी पाण्याच्या संपर्कात येत असल्याने त्यांची आधारकार्ड खराब होण्याची शक्यता असल्याने केंद्र शासनाकडून मच्छिमारांना नवीन टिकाऊ आधार ओळखपत्रे देण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व मच्छिमार सोसायट्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सागरी मासेमारी करणाऱ्या सर्व नौकामालक, तांडेल, खलाशी यांना नवीन आधारकार्ड देण्यासाठी त्वरित कार्यवाही सुरू करून मच्छिमारांचे विहित नमुन्यातील अर्ज मत्स्य विभागाकडे जमा करावेत, असे आवाहन मालवण येथील मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.जिल्ह्यातील मासेमारी नौकांवर अनेक व्यक्ती कार्यरत आहेत. कार्यरत असलेल्या काही व्यक्तींकडे यापूर्वी मत्स्य विभागामार्फत वितरीत करण्यात आलेली बायोमेट्रिक ओळखपत्रे आहेत. गेल्या ५-६ वर्षांपासून नवीन बायोमेट्रिक ओळखपत्रे देण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आलेली नाही. त्यामुळे आता कार्यरत असलेल्या अनेक क्रियाशील सागरी मासेमारी करणाºया नौका मालक, तांडेल, खलाशी यांच्याकडे बायोमेट्रिक ओळखपत्र आढळून येत नाही.मच्छिमार हे नेहमी पाण्याच्या संपर्कात येत असल्याने त्यांची आधारकार्ड खराब होण्याची शक्यता असते. तसेच अशी जुनी आधारकार्ड स्कॅन होण्यास अडथळे निर्माण होतात. यावर उपाय म्हणून आता केंद्र शासनाकडून नवीन टिकाऊ आधार ओळखपत्रे देण्यात येणार आहेत.याबाबत सर्व प्राथमिक कार्यप्रक्रिया संबंधित मच्छिमार संस्थेने पार पाडावयाची आहे. त्यामुळे संस्थेच्या कार्यक्षेत्रातील जे नौकामालक, तांडेल खलाशी यांच्याकडे कोणतेही ओळखपत्र आज उपलब्ध नाही, अशा सागरी मासेमारीसाठी जाणाऱ्या व्यक्तींसाठी प्रथम नवीन ओळखपत्रे उपलब्ध करून द्यावयाची आहेत. यासाठी मच्छिमार संस्थांनी जाहिरात, सूचना फलक इत्यादींमार्फत संस्थेच्या सभासद मच्छिमारांना याबाबत माहिती द्यावी.ज्या नौकामालक, तांडेल, खलाशी यांना असे नवीन आधार ओळखपत्र हवे आहे त्यांच्याकडून विहित अर्ज नमुन्याप्रमाणे एक वैयक्तिक अर्ज संस्थेने प्राप्त करून घ्यावा. अर्जासोबत संबंधित व्यक्तीच्या आधारकार्डची साक्षांकित प्रत व संबंधित व्यक्तीचा अलीकडच्या काळातील पासपोर्ट आकारातील फोटो जोडणे आवश्यक आहे.आधी नोंद असणे आवश्यक : घरच्या पत्त्यावर पाठविणारआधार क्रमांकाची नोंद बिनचूक करावी. संस्थेस प्राप्त झालेल्या अर्जाचा एक गोषवारा तयार करून संस्थेच्या पत्रासह प्राप्त अर्ज मत्स्य कार्यालयात सादर करावेत. प्राप्त अर्ज व त्याच्या नोंदी यावर कार्यालयाकडून नेमण्यात आलेले नवीन आधार ओळखपत्र समन्वय अधिकारी तेजस्विता करंगुटकर यापुढील कार्यवही करतील. प्राप्त अर्जावरील कार्यालयीन प्रक्रिया पार पाडल्यानंतर मच्छिमारांना नवीन टिकाऊ आधार ओळखपत्रे त्यांच्या घरच्या पत्त्यावर पोस्टाद्वारे पाठविण्यात येतील.नवीन सागरी मासेमारी हंगाम येत्या १ आॅगस्टपासून सुरू होणार असून सुरक्षेच्या दृष्टीने वातावरण संवेदनशील असल्याने मासेमारी करणाऱ्या सर्व नौकांची काटेकोर तपासणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सागरी कार्यक्षेत्रातील सर्व सागरी मासेमारी नौकामालक, तांडेल, खलाशी यांना नवीन आधार ओळखपत्र देण्यासाठी मच्छिमार संस्थांनी कार्यवाही करावी, असे आवाहन मत्स्य विभागाने केले आहे.समुद्रात मासेमारी करणारे क्रियाशील मच्छिमार, खलाशी, तांडेल, बायोमेट्रिक कार्ड नसलेल्या व आधारकार्ड असलेल्या मच्छिमारांचे अर्ज प्राधान्याने सादर करावेत. या मच्छिमारांचे आधी आधारकार्ड असणे अत्यावश्यक आहे.
मच्छिमारांना मिळणार टिकाऊ आधार ओळखपत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 4:54 PM
मच्छिमार हे नेहमी पाण्याच्या संपर्कात येत असल्याने त्यांची आधारकार्ड खराब होण्याची शक्यता असल्याने केंद्र शासनाकडून मच्छिमारांना नवीन टिकाऊ आधार ओळखपत्रे देण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व मच्छिमार सोसायट्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सागरी मासेमारी करणाऱ्या सर्व नौकामालक, तांडेल, खलाशी यांना नवीन आधारकार्ड देण्यासाठी त्वरित कार्यवाही सुरू करून मच्छिमारांचे विहित नमुन्यातील अर्ज मत्स्य विभागाकडे जमा करावेत, असे आवाहन मालवण येथील मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
ठळक मुद्देमच्छिमारांना मिळणार टिकाऊ आधार ओळखपत्रे मत्स्य विभागाकडे अर्ज जमा करावेत : त्वरित कार्यवाही करण्याचे आवाहन