मालवण : वातावरणातील बदल आणि परराज्यातील ट्रॉलर्सकडून होणाऱ्या मासळीची लुट या प्रमुख कारणांमुळे सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मत्स्य दुष्काळाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. मत्स्य दुष्काळजन्य परिस्थितीमुळे मासळीचा दरही वाढले असून सिंधुदुर्गातून निर्यात होणाऱ्या मासळीतही गतवर्षीच्या तुलनेत ५० टक्क्याहून अधिक घट झाली आहे. किनारपट्टीवर शेकडो नौका मासेमारीअभावी किनारपट्टीवर असून कोट्यवधीची होणारी उलाढाल मंदावली आहे. छोट्या पारंपरिक मच्छीमार आणि गिलनेट व ट्रॉलर्स पद्धतीची मासळी जाळीत मिळत नसल्याने दयार्राजा हवालदिल झाला आहे. किनारपट्टीवरील मत्स्योत्पादनात कमालीची घट झाल्याने मच्छिमार बांधवात चिंतेचे वातावरण आहे.मालवण किनारपट्टीवरील सजेर्कोट, दांडी किनारी नौका उभ्या स्थितीत दिसून येत आहेत. मत्स्य हंगामाची पापलेट, मोरी आदी "बंपरकॅच" मासळी मोठ्या प्रमाणात सापडल्याने आश्वासक सुरुवात झाल्याचे चित्र होते. मात्र, समुद्रातील खराब हवामानाचा फटका बसल्याने मासेमारी ठप्प झाली. तर नव्या मासेमारी हंगामापासून सिंधुदुर्ग किनारपट्टीवर परराज्यातील हायस्पीड व अनधिकृत पर्ससीन यांच्या द्वारे केला जाणाऱ्या मासळीच्या लयलुटीमुळे स्थानिक मासेमारीवर मोठा परिणाम झाला आहे. समुद्रात सुरमय, पापलेट, संरगा यासारख्या बड्या मासळीत मोठी घट झाली आहे. समुद्र्रात मासेमारीस गेलेल्या अनेक नौकांना मिळालेल्या मासळीतून रॉकेल, डिझेल आदी इंधनाचा खर्चही सुटत नसल्याचे किनारपट्टी भागात चित्र आहे. याला हवामानाबरोबरच परराज्यातील ट्रॉलर्सकडून होणारी माशांची लयलूटही कारणीभूत असल्याचे मत्स्य उद्योजक हरी खोबरेकर यांनी स्पष्ट केले आहे. किनारपट्टीवर शेकडो नौका मासेमारी अभावी उभ्या आहेत. त्यामुळे अजूनही काही दिवस मत्स्य दुष्काळाचे सावट राहणार आहे. (प्रतिनिधी)हवामानात बदल : पाण्याला करंटसमुद्री हवामानात मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. सुरुवातीच्या काळातील वादळसदृश स्थिती आणि आता दक्षिण-उत्तर दिशेने पाण्याचा जोरदार प्रवाह सुरु आहे. आता मच्छिमार भाषेत पाण्याला करंट असे म्हणतात. यात मासळी बाहेर ओढली जाते. बाहेर गेलेली मासळी स्थानिक मच्छिमारांना न मिळता सहजच परप्रांतीय ट्रॉलर्सच्या जाळीत सापडते. पापलेट, सुरमय अशा बड्या व किमती मासळीसाठी स्वतंत्र मासेमारी जाळी असते. गिलनेट पद्धतीने मासेमारी करणाऱ्या सिंधुदुर्गातील मच्छिमारांच्या जाळीत मासळीच गेल्या तीन महिन्यापासून मिळत नाही. २० ते २५ टक्केही मासेमारी या हंगामात झाली नाही.
किनारपट्टीवर मत्स्य दुष्काळाचे सावट
By admin | Published: November 26, 2015 10:47 PM