शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

मासेमारीस बंदी

By admin | Published: June 10, 2014 1:35 AM

पावसाळा : १५ आॅगस्टपर्यंत कालावधी

सिंधुदुर्गनगरी : मासळीच्या साठ्याचे जतन तसेच मच्छिमारांच्या जीविताचे रक्षण व्हावे या हेतूने यावर्षी १५ जून ते १५ आॅगस्ट या कालावधीत राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात यांत्रिक मासेमारी नौकांस पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. याबाबतची माहिती मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्तांनी दिली आहे. मासेमारी बंदीच्या कालावधीत मासळीच्या जिवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीज निर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जतन होते. त्याशिवाय या कालावधीत खराब, वादळी हवामानामुळे होणारी मच्छिमारीची जिवीत व वित्तहानी मासेमारी बंदीमुळे टाळता येणे शक्य होते. पावसाळी मासेमारी बंदी महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ अन्वये सर्व यांत्रिक नौकांना लागू राहील. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्राबाहेर (सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलापुढे) खोल समुद्रात मासेमारीस जाणाऱ्या नौकांस केंद्रशासनाच्या खोल समुद्रातील मासेमारीबाबतच्या मार्गदर्शक सूचना लागू राहतील. या मार्गदर्शक सुचनांनुसार खोल समुद्रातील मासेमारी नौकांस राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात मासेमारी करता येणार नाही व त्याकरीता वापरण्यात येणारे डिझेल विभागाने संस्था, नौकांना मंजूर केलेल्या डिझेल कोट्यातून वापरता येणार नाही. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलापर्यंत) यांत्रिक मासेमारी नौका पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ अन्वये कलम १४, १५ व १६ अन्वये कार्यवाही करून १७ (१) (२) (३) अन्वये कठोर कारवाई करण्यात येणार आहे. मासेमारी बंदी कालावधीत ज्या मच्छिमार सहकारी संस्थांच्या यांत्रिक मासेमारी नौका मासेमारी करताना आढळतील अशा संस्थांनी पुरस्कृत केलेले अर्ज रा. स. वि. नि. योजनेच्या लाभाकरीता विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना मासेमारी यांत्रिक नौकेस अपघात झाल्यास अशा नौकेस कोणतीही नुकसान भरपाई शासनाकडून मिळणार नाही. मच्छिमार, सभासदांनी या बाबींची नोंद करून घ्यावी. तसेच बंदी कालावधीत यांत्रिकी नौकांद्वारे मासेमारी केली जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन मालवण येथील मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्तांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. (प्रतिनिधी)