शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

कोकणात पाच दिवस अतिवृष्टी!

By admin | Published: July 25, 2016 12:46 AM

वेधशाळेचा अंदाज : सावधानतेचा इशारा

रत्नागिरी : गेल्या महिनाभरापासून मुसळधार बरसणाऱ्या पावसाने शनिवारी रात्री धरलेली संततधार रविवारी दुपारपर्यंत कायम होती. त्यानंतर काही काळ पावसाने विश्रांती घेतली. मात्र, कोकणात येत्या पाच दिवसांत पावसाचा जोर कायम राहणार असून, ७ ते ११ सेंटी मीटर पाऊस पडेल, असा धोक्याचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. २० जून २०१६ पासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. अत्यल्प वेळ पावसाने विश्रांती घेतली. शनिवारी दिवसभर सुरू असलेल्या पावसाने रात्रीही विश्रांती घेतली नाही. रविवारी दुपारपर्यंत पावसाने जोरदार दणका दिला. त्यानंतर सायंकाळी काही काळ पावसाने विश्रांती घेतली. मात्र, वेधशाळेने दिलेल्या इशाऱ्यानुसार येत्या पाच दिवसांत जोरदार पाऊस झाल्यास आधीच धोका पातळीपर्यंत आलेल्या नद्या ही पातळी ओलांडून पूरपातळीही ओलांडण्याची भीती व्यक्त होत आहे. तसे झाले तर अर्जुना, जगबुडी, कोदवली या नद्यांना पूर येण्याची शक्यता असून, परिसरातील भातशेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. त्याचबरोबर नागरी वस्तीतही पाणी घुसण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर गेल्या महिनाभरात कमी न झाल्याने शेतकरीही चिंतेत आहेत. शेतांमध्ये पाणी भरल्यास रोपे कुजण्याची भीतीही आहे. (प्रतिनिधी)