शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहिणींना २१०० रुपये, २५ लाख नवीन नोकऱ्या...; भाजपच्या संकल्प पत्रात काय-काय?
2
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, पवारांचंही नाव घेतलं!
3
"मग मी पण बघतो तुम्ही आमदार कसे काय राहता", अजित पवारांचं रामराजेंना आव्हान
4
परशुराम घाटात पुन्हा भीषण अपघात, एसटी चालकासह एक प्रवासी जखमी, वाहतूक ठप्प
5
धक्कादायक! २५ मुलींना जाळ्यात अडकवलं, लाखो रुपये उकळले; बनावट IRS चा झाला पर्दाफाश
6
"राहुल गांधींनी आपल्या वडिलांना आणले, तरी...", प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली
7
"बापाचा विषयच नाही इथे, तुमचे काकाच..."; जयंत पाटलांचा अजित पवारांवर 'वार'
8
"अरे माझ्या सभेत गुंड प्रवृत्तीचे लोक पाठवून धिंगाणा काय करता? ताईंनो..."; आमदार बंब विरोधकांवर जाम भडकले
9
पान मसालाच्या जाहिरातीवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर अजय देवगणची प्रतिक्रिया, म्हणाला...
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ; उत्तम यश-प्रगती, विठ्ठल-रखुमाई शुभच करतील!
11
ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
12
महिलांची व्यवस्था करतो ही कसली भाषा? धनंजय महाडिकांना प्रणिती शिंदेंचा संतप्त सवाल 
13
"...तर राजीनामा देऊन त्यांचा कार्यकर्ता होईन"; आमदार प्रशांत बंब यांचं चॅलेंज सतीश चव्हाण स्वीकारणार?
14
कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरण: ज्युनियर डॉक्टरांचं आंदोलन; ममता सरकारवर गंभीर आरोप
15
वयाच्या ८० व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते गणेश यांचं निधन, ४०० हून अधिक सिनेमांमध्ये केलेलं काम
16
'सिंघम अगेन'मधील सलमान खानच्या कॅमिओवर रोहित शेट्टी म्हणाला, "त्याच्या सुरक्षेमुळे..."
17
भाजपा आमदाराच्या भावाची घरात घुसून बेदम मारहाण करून हत्या; नातीच्या अपहरणाचा प्रयत्न
18
'आंबेडकर जिंदा हैं तो गोडसे मुर्दा है'; पंतप्रधान मोदींच्या 'एक हैं तो सेफ हैं'वर काय म्हणाले ओवेसी?
19
राम चरणचा 'लय भारी' अंदाज अन् जोडीला कियारा अडवाणी! 'गेम चेंजर'चा हटके टीझर रिलीज
20
"पराभूत झाल्या तर मुलांचा सांभाळ करतील, याचा फायदा...", भाजप नेत्याचे RLP खासदाराच्या पत्नीबाबत विधान

Sindhudurg: शिकारीसाठी निघालेल्या पाच जणांना खारेपाटण येथे घेतले ताब्यात, कणकवली पोलिसांची कारवाई

By सुधीर राणे | Published: May 31, 2024 12:24 PM

काडतुसची बंदूक, काडतुसे, कार जप्त.

कणकवली: देवगड तालुक्यातील मुटाट येथून राजापूरच्या दिशेने शिकारीच्या उद्देशाने जात असताना  पाच जणांना कणकवली पोलिसांनी खारेपाटण तपासणी नाक्यावर ताब्यात घेतले आहे.त्यांच्याकडून काडतुसच्या बंदुकीसहित जिवंत काडतुसे व प्रवासासाठी वापरलेली कार असा ६ लाख २३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.  त्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.याबाबत पोलीस कॉन्स्टेबल नितीन बनसोडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संशयित आरोपी एका कारमधून देवगड येथून राजापूरच्या दिशेने जात होते. संशय आल्याने खारेपाटण पोलिस तपासणी नाका या ठिकाणी  त्यांच्या गाडीची तपासणी करण्यात आली.  या गाडीमध्ये देवगड तालुक्यातील संशयित आरोपी जितेंद्र बाबाजी पाळेकर (४०,रा. मुटाट पाळेकरवाडी), गोपाळ लक्ष्मण पाळेकर (५४, रा. मुटाट, पाळेकरवाडी), विसंगत विश्वास साळुंखे (३१,रा. मुटाट, बौद्धवाडी), विनोद राजाराम साळुंखे (३६,रा. मुटाट, बौद्धवाडी), संतोष सखाराम पाळेकर (५०,रा. मुटाट, पाळेकरवाडी) हे पाचजण होते. या संशयित आरोपींकडून २० हजार रुपये किमतीची काडतुसांची बंदूक, ५ जिवंत काडतुसे, ७०० रुपयाची हेडलाईट, आकाशी रंगाचे कव्हर व ६ लाख रुपये किंमतीची कार असा एकूण ६ लाख २३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.तसेच त्यांना विनापरवाना काडतुसची बंदूक घेऊन शिकारीच्या उद्देशाने जात असल्याने पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कणकवली पोलिस निरीक्षक समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रवींद्र शेगडे, कॉन्स्टेबल नितीन बनसोडे, विनोद चव्हाण यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवलीCrime Newsगुन्हेगारी