शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
5
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
6
"मविआ नेत्यांकडून जनतेची दिशाभूल", नागपुरात देवेंद्र फडणवीस यांची प्रचार रॅली
7
५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
8
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
9
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
10
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
11
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
12
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
13
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
14
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
15
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
17
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
18
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
19
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!

एक एकरमध्ये फुलवला झेंडूचा मळा तरुणांना आदर्श : कणकवलीच्या दाम्पत्याची जिद्द

By admin | Published: November 30, 2015 12:31 AM

मांडकीत फुलली दहा एकरमध्ये शेती

मिलिंद डोंगरे-- कनेडी--कृषी क्षेत्रात भरारी घेण्यासाठी गावात भरपूर संधी आहे. बेरोजगार तरूणांनी नोकरीनिमित्त शहराकडे धाव घेण्याची काही गरज नाही. शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून स्पर्धात्मक शेती करत दरडोई उत्पन्न वाढवता येते. यश मिळवण्यासाठी चिकाटी, जिद्द व मेहनत यांची सांगड घालावी लागते. हे कणकवली तालुक्यातील नाटळ मोगरणेवाडी येथील उपक्रमशील शेतकरी सुभाष अनाजी घाडीगावकर व त्यांची पत्नी शुभांगी घाडीगावकर या दाम्पत्याने एक एकर शेतीमध्ये झेंडूच्या फुलांची शेती करून आपल्या शेतात हरितक्र ांती केली आहे. घाडीगावकर यांना पूर्वीपासून शेतीमध्ये आवड होती. पारंपरिक शेतीला बगल देत व्यावसायिक तत्त्वावर झेंडू फूलशेती करण्याचे ठरवले. वडिलोपार्जित शेती बहरण्याची स्वप्न ते पूर्वीपासून पाहात होते. परंतु काही कारणास्तव त्यांना ती करता आली नाही. दहावीपर्यंत शिक्षण घेऊन त्यांनी शेतीमध्ये झोकून दिले. वडिलोपार्जित शेतीमध्ये आधुनिक पद्धतीचा वापर करून त्यांनी भातशेती केली. भातशेतीमध्ये आधुनिक बदल करत असताना त्यांना जिल्हा व तालुकास्तरीय कृषी पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या या यशात त्यांच्या पत्नीचा सिंहाचा वाटा आहे. नुसत्या शेतीवर अवलंबून न राहता आधुनिकतेबरोबरच यांत्रिकीकरण आणण्याचा प्रयत्न केला. भातशेती न करता आंबा, काजू बागायतीतही नवनवीन प्रयोग केले. जोेडधंदा म्हणून कुक्कुटपालन, शेळीपालन व्यवसाय केला. अंडी व चिकनसाठी उपयुक्त अशा गावरान कोंबड्यांची विष्टा व लेंडी खत शेतीत वापरले. कोणतेही संजीवक अथवा रासायनिक खत न वापरता सेंद्रीय खतावर दर्जेदार उत्पन्न घेता येते हे त्यांनी दाखवून दिले. कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घेत त्यांनी झेंडूची फूलशेती करण्याचे ठरवले. आपल्या शेतात प्रायोगिकतत्त्वावर झेंडूची शेती करण्याचा मानस त्यांनी पत्नी व मुलांकडे व्यक्त केला. घरच्या सदस्यांचा कौल मिळताच त्यांनी योजना आखण्यास सुरुवात केली. घरापासून काही अंतरावर असलेल्या एक एकर शेतीमध्ये झेंडूची लागवड करण्याचे ठरवले. झेंडू रोपांचा पुरवठा करणाऱ्यांची माहिती त्यांना कणकवली कृषी विभागाकडून मिळाली. वाचनालयातून त्यांना सेंद्रीय फूलशेतीबाबतचे संदर्भ व उपयुक्त माहिती मिळाली. कोल्हापूर येथून कलकत्ता रेड जातीची झेंडूची दोन रुपये पन्नास पैसे प्रतिरोप दराने अडीच हजार रोपे आणली. झेंडूच्या रोपांची लागवड, वाफे तयार करणे, रोपामधील अंतर, खताचे प्रमाण, रोग व कीड नियंत्रण याबाबतचे मार्गदर्शन कृषी अधिकाऱ्यांंकडून घेण्यात आले. झेंडू फूल लागवडीला जमिनीची मशागत करून शास्त्रोक्त पद्धतीने लागवड केली. गेली दोन वर्षे ते झेंडूची लागवड करत आहेत. यावर्षीही मोठ्या प्रमाणावर त्यांनी झेंडूची लागवड केली. गणेशोत्सव व दसऱ्याचा हंगामात घरोघरी जाऊन त्यांनी फुलांची विक्री केली. एका रोपाला एक किलो फुले येतात. पहिल्या तोडणीत स्थानिक बाजारपेठेत किलोवर त्यांनी फुलांची विक्री केली. गेली दोन वर्षे प्रायोगिकतत्त्वावर ही शेती केली. यावर्षी व्यावसायिक तत्त्वावर शेती करण्याचा प्रयत्न केला व आर्थिक नियोजन बऱ्यापैकी झाले. तरूणांनी पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता आधुनिक व सांघिक पद्धतीने शेती करण्यावर भर दिला पाहिजे. भाताबरोबरच सूर्यफूल, भुईमूग, कुळीथ, हळद, पालेभाज्यांबरोबर कुक्कुटपालन, शेळीपालन यांसारखे हुकमी उत्पन्न देणारे व्यवसाय करायला हवेत. कोकणातील शेत जमीन सुपीक आहे. त्या सुपीकतेच्या जोरावर येथील तरुणांनी प्रयत्न करणे, विविध पिके घेत आपले दरडोई उत्पन्न वाढवण्याचे ध्येय ठेवावे. शेतीतही मानसन्मान मिळू शकतो. हे घाडीगावकर दाम्पत्याने दाखवून दिले आहे. कोकणात फुलशेतीला अनुकूल असे वातावरण आहे. आपल्याला मिळालेल्या अनुभवाची शिदोरी मी बेकार तरूणांना एकत्रित करून देणार आहे. कृषी क्षेत्रात करिअर करण्यासंबंधी येथील तरूणांना आपण मार्गदर्शन करणार असल्याचे ते म्हणाले. कृषी विभागाने शेत मालाची विक्री व्यवस्थापन व पाण्याचे योग्य नियोजन करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.मांडकीत फुलली दहा एकरमध्ये शेती बाळू कोकाटे --सावर्डेकाम करण्याची जिद्द, मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. हे चिपळूण तालुक्यातील मांडकी गुरववाडीतील राजेंद्र नारायण गुरव यांनी दाखवून दिले आहे. आपल्या कठीण परिस्थितीशी सामना करून आज १० एकरमध्ये कलिंंगड, पावटा, टोमॅटो, पालेभाजी, फळशेतीची लागवड केली आहे. हा व्यवसाय गेल्या १५ वर्षांपासून करीत आहेत. शासनाच्या योजना ह्या केवळ दाखवण्याकरिता असतात. प्रत्यक्षात पाहता परिस्थिती खूप वेगळी असते. कठीण परिस्थितीत कुठलीही बँक दारात उभी करत नसल्याचा प्रत्यय त्यांना आला. मात्र, त्यांनी उराशी बाळगलेले स्वप्न आज त्यांनी सत्यात उतरवले आहे.एकूण दहा एकर क्षेत्रापैकी ७ एकरमध्ये कलिंंगडची लागवड केली जाते. यासाठी सरासरी ४ लाख रुपये इतका वार्षिक खर्च येतो. या पिकांच्या लागवडीसाठी लागणारे मुबलक पाणी जवळच्याच नदीच्या किनाऱ्यावर खोदलेल्या विहिरीतून घेतले जाते. जमिनीची मशागत करून नांगरणी पेरणी केली जाते. यात कृत्रिम व रासायनिक खतांचा वापर केला जातो. लागवडीनंतर फळ मोठे झाल्यावर जवळच्या बाजारपेठेत विक्रीसाठी आणले जाते. याशिवाय फळभाज्या व पालेभाज्यांचीदेखील लागवड केली जाते. यात प्रामुख्याने पावटा, पालक, मुळा, केळी, टॉमेटोचे पीक घेतले जाते. ही पिके आठवड्याच्या बाजारात विक्रीसाठी नेली जातात. पालेभाजीची एक एकरमध्ये लागवड केली जाते. भाजीसाठी तीन महिन्यांकरिता ९५ हजार रुपये इतका खर्च येतो, तर केळी लागवडीसाठी ६० हजार रुपये खर्च येतो. हे पीक ११ महिन्यांनंतर लागण्यास सुरुवात होते. या संपूर्ण शेती लागवडीसाठी त्यांचे संपूर्ण कुटुंब, ते स्वत:, पत्नी आणि दोन मुले दिवसभर काम करतात. सकाळी ६ वाजता शेतात गेल्यावर सायंकाळी सात वाजता घरी परतात. सात वर्षांपूर्वी केलेल्या लागवडीवर मुल्टा आल्याने पिकांच्या वेली खुरटत चालल्या होत्या. कलिंगडांवर मावा रोग आल्याने संपूर्ण शेतीचे नुकसान झाले होते. त्यावेळेला आमची परिस्थिती खूप बेताची होती. त्यावेळी खूपच नुकसान झाले होते. पण त्याही परिस्थितीत आम्ही डगमगलो नाही. त्या अडचणीच्या काळात कोणत्याही शासकीय बँकांनी साधा मदतीचा हातही दिला नाही. मात्र, माझी जिद्द आणि मेहनतीची दखल चिपळूण नागरी पतसंस्थेने घेतली. तत्काळ शेती लागवडीसाठी एक लाख रुपये मंजूर केले. माझ्या कठीण प्रसंगात माझ्या पाठीशी पतसंस्था उभी राहिल्यानेच आज हा व्यवसाय चांगल्या प्रकारे सुरू आहे, असे गुरव यांनी सांगितले.